BCA (आताचे MCA) सचिव म्हणजे एस.के. वानखेडे यांच्या पुढाकाराने हे स्टेडियम तयार झाले.
इतिहासाने आपल्याला खूप वेळा दाखवून दिले आहे की एक साम्राज्याचा पतन होऊन दुसर्या साम्राज्याचा उदय होतो. १९७३ मध्ये देखील असेच काही घडले. चला मग जाणून घेऊ.. पण सुरु करण्या आधी थोडं ब्राबॉऊर्न स्टेडियम बद्दल जाणून घेऊ..
त्याकाळी मुंबई मध्ये एकाच स्टेडियम होत ते म्हणजे ब्राबॉऊर्न स्टेडियम आणि हे स्टेडियम CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) च्या अंतर्गत आहे. मुंबई मधले सर्वे आंतराष्ट्रीय सामने ह्याच स्टेडियम वर खेळवले जायचे आणि ह्याची क्षमता २०००० इतकी आहे. ह्या स्टेडियमला भारताचे लॉर्ड्स बोलले जायचे आणि सर्व आंतराष्ट्रीय सामने इथेच खेळवले जायचे. त्या काळी हे खूप नावाजलेला स्टेडियम होते आणि समुद्रा जवळचे हे एकमेव स्टेडियम होते. विजय मर्चन्ट(पूर्व क्रिकेटपट्टू) त्या स्टेडियमचे अध्यक्ष होते, मर्चन्ट जुन्या क्रिकेटच्या वातावरणात वाढलेले होते म्हणजे त्या काळी क्लब स्पर्धा जास्त होती म्हणजेच भाषिक आणि धार्मिक आधारावर्ती क्लब बनवले जायचे आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक कटुता नेहमी असायची. असं देखील म्हण्टले जायचे कि त्यांना मराठी माणसाबद्दल राग होता.
CCI आणि MCA मधला वाद..
त्या वेळेस क्रिकेट सामानाचे वेळेपत्रक MCA ठरवायचं पण मॅचेस होयच्या CCI च्या ब्राबॉऊर्न स्टेडियमला म्हणून तिकिटा वरून दोघांमध्ये नेहमी वाद असायचा कारण तिकीट जास्त CCI च्या मेंबर ला भेटायची म्हणून दोघांमध्ये नेहमी कट्टुत होती.
चला मग जाणून घेऊ काय आहे ती गोष्ट..
मित्रांनो स्टेडियमच्या जन्मामाघे कहाणी होती ती एका मराठी माणसाच्या अपमानाची, जितके रंजक रेकॉर्ड वानखेडे मध्ये बनले तितकेच रंजक वानखेडे स्टेडियम च्या निर्माणाची कहाणी आहे.
१९७२ ची वेळ होती आणि त्या काळी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते बॅरिस्टर शेषराव वानखेडे, वानखेडे खूप हुशार व महाराष्ट्राचे पहिले अर्थ मंत्री होते, त्यांना क्रिकेटची अफाट आवड होती आणि त्यामुळे त्यांनी MCA आणि BCCI मधील अनेक पद देखील भूषवली होती.
वानखेडेंची हि आवड पाहून काही आमदार एक प्रस्थाव घेऊन त्यांच्या कडे गेले कि आपण आमदारांसाठी एक क्रिकेट स्पर्धा भारवूया म्हणजे सर्व आमदारांचा एक प्रदर्शनीय सामना, हा प्रस्ताव त्यांना खूप आवडला आणि त्यांनी त्वरित होकार कळवळा. हिरवा कंदील भेटल्यावर असे ठरले कि सामना ब्राबॉऊर्न स्टेडियम वर खेळवला जाईल आणि त्याचा प्रस्ताव घेऊन CCI कडे गेले..
वानखेडे काही वरिष्ठ नेते आणि काही आमदारान सोबत प्रस्ताव घेऊन विजय मर्चन्ट कडे गेले आणि प्रस्ताव सौपावला कि ब्राबॉऊर्न वर खेळण्याची परवानगी मिळावी. विजय मर्चन्टने सर्व काही ऐकून घेतलं पण त्यांनी तो प्रस्ताव धुडकावला व म्हणाले कि आमदारांच्या मॅच साठी स्टेडियम देणार नाही कारण हे इंरनॅशनल दर्जाचे स्टेडियम आहे आणि इथे फक्त इंटरनॅशनल मॅच खेळवले जातात, नाकार ऐकताच सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समजावलं पण काही तोड निघाला नाही आणि तिथे एक वादाची ठिणगी पेटली आणि वाद वाढला व शाब्दिक चकमक देखील झाली आणि वानखेडे रागात बोलून गेले कि तुम्ही देत नाही तर आम्ही आमचा स्टेडियम बांधू. असे बोलले जाते कि त्या वेळेस मर्चन्ट यांनी उत्तर म्हणून “घाटी लोक काय स्टेडियम बांधणार” अशे हिनवले होते.
वानखेडेंना हा अपमान जिव्हारी लागला आणि ठरवलं की आता स्टेडियम बांधायचा, एक मराठी माणसाचा स्टेडियम. मग काही दिवसात हा प्रस्ताव घेऊन ते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक ह्यांच्याकडे गेले पण नाईक म्हणाले कि मुंबई मध्ये स्टेडियम आहे मग हे कशाला, त्यांना हि कल्पना पटली नाही पण वानखेडेंनी हट्ट केला व ते बोलले की तुम्ही फक्त जागा द्या स्टेडियम बंधायचा आम्ही करू व स्टेडियम बांधून घेऊ.
त्यांना जागा मिळाली, मॅरीने ड्राईव्ह जवळची जागा, रेल्वे ट्रॅक जवळची जागा. ७ साडे सात एकर मध्ये त्यांना स्टेडियम बांधायचा होते, त्यांनी ठरवलेला कि हे स्टेडियम ब्राबॉऊर्न पेक्षा मोठं व भव्य असायला पाहिजे आणि जबाबदारी शशी प्रभू म्हणून आर्किटेकला देण्यात अली. शशी प्रभूने खूप स्टेडियमला भेट दिल्या आणि प्लॅन तयार केला आणि काम खूप वेगाने केले आणि ११ महिना २३ दिवसात स्टेडियम तयार झाले..
आणि तेव्हा पासून आता पर्यंत मुंबईतील सर्व अंतराषरीय सामने वानखेडे स्टेडियमलाच होतात.