मुरलीधरन साठी मॅच थांबवली आणि रणतुंगाने वाचवले मुरलीधरनचे करिअर..

खेळामध्ये बरेचदा खेळाडू आणि कर्णधारांमधले वाद विवाद पाहायला मिळतात. परंतु खेळाडूवर अन्याय होतोय म्हणून संपूर्ण संघासह मैदान सोडणार कर्णधार तुम्ही पाहिलाय का? नाही ना?  मग हि गोष्ट आहे श्रीलंकन क्रिकेटर आणि माजी कॅप्टन अर्जुन रणतुंगा आणि क्रिकेटर मुथय्या मुरलीधरन ची.  

तर मुळात या कहाणीची सुरुवात झाली ती 1995 मध्ये. मैदानावर मुरलीधरन अगदी नवखा होता. DARRELL HAIR नावाचा पंच होता. आयसीसीच्या नियमानुसार असे म्हटले जाते की बॉलिंग करताना आपला हात वाकवल्यानंतर आपण पुन्हा सरळ करू शकत नाही. अशा बॉलला थ्रो बॉल म्हटले जाते. अन हे ठरवतो कोण तर मैदानावर असलेले पंच अंपायर … आणि इथेच खरे नाट्य  सुरू झाले. अंपायर DARRELL HAIR  ने हेच त्याचे कर्तव्य समजून नो बॉल देणे सुरू केले.

कर्णधार रणतुंगा मुरलीधरनला दुसऱ्या एन्ड वरून गोलंदाजी दिली जेणेकरून तो DARRELL HAIRच्या तावडीतून सुटावा. पण आश्चर्य म्हणजे अंपायर  ओव्हर लेगवर उभं राहून नो बॉल कॉल  करू लागला.  क्रिकेट इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडत होता. सामन्यानंतर श्रीलंकेने पंचांशी विचार विनिमय करून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आयसीसीनेहि त्याला परवानगी दिली. मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्यांना थांबवलं आणि पुढच्या सामन्यातही हेच चालू राहिले. त्यावेळी अंपायर होता इमर्सन नावाचा एक ऑस्ट्रेलियन. ज्याने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला.

खरेतर नो बॉलचा मुद्दाच मुरलीधरनच्या ऑफस्पिनशी निगडित होता. इमर्सन ने त्याचे लेग ब्रेक्स हि नो बॉल देण्यास सुरुवात केली.  बरं, लेग ब्रेक्सही हात  सरळ करून टाकणं शारीरिक दृष्ट्या अशक्य आहे. हे जगमान्य आहे. पण त्यांच्या मते तो नोबॉल होता. याचा परिणाम म्हणून शेवटी मुर्लीला संघाबाहेर बसावे लागले. आणि ती मालिका श्रीलंकेने 3-0 अशी गमावली.

मात्र काही वर्षांनंतर या दोन पंचांच्या या वागण्याला आत्तापर्यंतची सर्वात वाईट पंचगिरी असे संबोधले गेले. स्वतः डॉन ब्रॅडमन यांनी एका मुलाखतीत याचा उल्लेख केला. मुरलीची आयसीसीकडून चौकशी करण्यात आली आणि त्याची बॉलिंग ॲक्शन पूर्णपणे कायदेशीर असल्याचे जाहीर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मुरलीची केस सेटल केली. पण, आयसीसीची अक्कल ती किती त्यांना क्रिकेटमधलं काय कळत? ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड म्हणजे बुद्धिमानांचा समुद्र आणि ऑस्ट्रेलियाने गोष्टी आपल्या हातात घेण्याचे ठरवले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील ऑस्ट्रेलियन तिरंगी मालिका ऑस्ट्रेलियात जोरात सुरू होती. संपूर्ण मालिकेदरम्यान मुरलीला अशिक्षित आणि रणतुंगाला एक रानटी खेळाडू अशी प्रसिद्धी देण्यात आली. 

ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमातून त्यांची अशा प्रकारे चुकीची चर्चा जोरात चालू ठेवली. प्रत्येक दिवशी माध्यमातून हे दोघे किती अनैतिक पणे खेळतात आणि क्रिकेटचा आत्मा कसा धोक्यात आलाय अशा आशयाचे लेख छापले जाऊ लागले. आणि शेवटी आठव्या सामन्यापूर्वी जो श्रीलंका इंग्लंड दरम्यान खेळला जाणार होता आणि ज्यात पंच इमर्सन अंपायरिंग करणार होता. ( होय तोच इमर्सन ज्याने तीन वर्षा आधी मुरलीधरन ला चुकीचा खेळाडू ठरवले होते) ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने इमर्सन ला  स्पष्टपणे निर्देश दिले की त्याने या सामन्यात आधीचे रुल्स पळाले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात आयसीसीकडून क्लिअर केल्यावर सुद्धा मुरलीला कायमचा घरी बसावा आणि एसीबीच्या समर्थनामुळे स्क्वेअर लेगला उभा असलेला इमर्सन मुरलीला नो बॉल देऊन फसला आणि हि शेवटची कांडी ठरली.

वर्षानुवर्षे मुरलीला आणि श्रीलंकेच्या संघाला या आरोपांचा सामना करावा लागला होता. आणि यावेळी आयसीसीने स्पष्ट निर्णय दिला असूनही अंपायरचा असा मनमानी निर्णय. श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगा पंचांनी  अन्यायकारक वागणूक दिल्याचा आरोप करत पंचांशी हुज्जत घालू लागला. आयसीसीच्या निर्णयाचा तो सतत उल्लेख करत राहिला परंतु एसीबीच्या पाठिंब्यामुळे पंच इमर्सन आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि नाटकाचा   क्लायमॅक्स सुरू झाला कर्णधार रणतुंगा शांतपणे निघाला त्यांनी इंग्लिश खेळाडूंना निरोप दिला आणि आपल्या खेळाडूंना घेऊन त्याने पॅव्हेलियनची   वाट धरली. रणतुंगा इतक्या तातडीने असा निर्णय घेईल याची कोणालाच अपेक्षा नव्हती मॅच रेफ्रीनी खेळाडूंना रोखण्यासाठी खेळपट्टीवर धाव घेतली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे फोन केले गेले आणि दरम्यान एक अनधिकृत तडजोड झाली. मुरली फक्त लेग ब्रेक टाकेल आणि पंच इमर्सन नो बॉल करणार नाही. 
सामना पुन्हा सुरू होणार होता. मात्र, श्रीलंकेच्या कर्णधारला झुकणे आता मान्यच नव्हते. त्याने मुरलीधरन ला स्पष्ट सांगितले तुला काय बॉल टाकायचे आहेत ते तू टाक. आपल्याला कोण अडवत ते पाहू. मुरलीने हि तसेच केले आणि इमर्सनला ते पाहावे लागले. संपूर्ण ऑस्ट्रेलियन माध्यमांद्वारे रानटी आणि अशिक्षित म्हणून हिणवल्या गेलेल्या अर्जुनाने दाखवायचे  ठरवले रानटीपणा काय असतो. इमर्सनला आणखी डिवचण्याचा त्याने एन्ड कडून बॉलिंग टाकायला सांगितले. इमर्सन हे पचवू  शकला नाही. त्याने मुरलीला तो रणपच्या अगदी जवळून जातोय असा आक्षेप घेतला. यावर रणतुंगा शांतपणे म्हणाला आपण पंचगिरी करा मी कॅप्टनिंग करतो. माझा बॉलर त्याला पाहिजेल तिथूनच बॉल टाकेल. मित्रांनो संपूर्ण सामना संपेपर्यंत दोन्ही बाजूंनी धुमशान शाब्दिक युद्ध सुरू होते. पंचांचसोबतच्या वागणुकीबद्दल ऑस्ट्रेलियन बोर्ड मुरलीला शिक्षा व्हावी यासाठी आग्रही होते. हे सर्व झाल्यानंतर मुरलीला विश्रांती द्यायला हवी होती का? या प्रश्नाला अर्जुनाने सहज उत्तर दिले. मुरलीधरनची बॉलिंग एक्शन क्लीन म्हणून जाहीर केली आहे. मी एक किंवा दोन पंचांची चिंता का  करावी. आणि म्हणूनच एक  कर्णधार उभा राहिला कांगारूंच्या विरोधात एका होतकरू तरुणाचे रक्षण करण्यासाठी. आज तोच तरुण क्रिकेट विश्वात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम करून बसलाय. तो तरुण जाणे या सामन्यात विजयी धाव घेतली आणि अंपायर इमर्सनला स्क्वेअर लेगवरून ते पहावं  लागलं. तर अशी आहे हि एका खेळाडू आणि कर्णधाराची क्रिकेट विश्वातली अनोखी कहाणी.