अंबर रॉय.. भारतीय क्रिकेट विश्वाला पडलेले एक सोनेरी स्वप्न..

न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर होता, ही गोष्ट आहे  5 ऑक्टोबर 1969 ची. तीन टेस्ट सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना नागपुरात खेळला जाणार होता. पहिल्या डावात न्यूझीलंडने 319 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने 150 धावांत 6 गडी गमावले होते. अशा वेळी 23 वर्षीय डाव्या हाताचा फलंदाज क्रीजवर आला आणि त्याच नाव होतं अंबर रॉय.

स्कोअर मध्ये 11 रणांची भर झाली होती इतक्यात अशोक मांकड देखील बाद झाला. आता क्रिझवर अंबर सोबत फारूक इंजिनिअर होता. डायल हेडलीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या न्यूझीलंडच्या संघाला वाटले आता भारतीय संघ हरल्यात जमा आहे. फक्त त्यांनाच नव्हे तर सर्वांनाच असे वाटले.  पण स्वतःच्याच नादात असलेल्या अंबरच्या मनात मात्र काही वेगळेच सुरु होते. 

लोड नाय घ्यायचा !

अंबरने आज चमकदार कामगीरी करण्याचा मनातून निर्णय घेतला होता. असे म्हटले जाते की अंबर हा असा खेळाडू होता ज्याने आपल्या आयुष्यात कधीही कसली चिंता केली नाही. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर त्याने लोड घेतला नाही. जर सामना असेल तर अंबर फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला असला तरीही पॅड बांधून झोपत असे. जेव्हा त्याची पाळी येईल तेव्हा सहकारी खेळाडू त्याला उठवायचे. अंबर मैदानात आल्यावर कधी शन्यू तर कधी शतक करुन परतत असे. प्रसंग काही असला तरी तो एक सिगारेट पेटवे आणि बिनधास्तपणे बसे.

पण त्यादिवशी मात्र अंबरने लोड घेतला होता. हेडली, बॉब कानिस, हेडली हॉवर्ड, विक पोलार्ड आणि ब्रायन युले यांसारख्या दिग्गजांनी जोर धरला होता पण त्यांना अंबरला हलवता येत नव्हते. त्यादिवशी अंबर ने केलेल्या कामगिरी पुढे प्रसिद्ध फलंदाज फारुख इंजिनियर देखील फिका पडला होता.

अखेरीस 48 धावा काढून अंबर अंतिम विकेट म्हणून बाद झाला. या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी भारतात जसे होते तसेच झाले. लोकांनी अंबरला क्रिकेट विश्वातला पुढचा स्टार म्हणून घोषित केले. हे पाहून त्याचे काका पंकज रॉय हसले. भारतीय संघाचा सलामीवीर असलेल्या पंकज यांना वाटले की पुतण्या आपला वारसा पुढे चालवेल.पण तसे झाले नाही. अंबरला पुढच्या तीन डावांमध्ये फक्त 2, 0 आणि 4 धावा करता आल्या आणि ही मालिका संपली.

टीम इंडियाची पुढची मालिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध होती. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड समितीने अंबरची निवड केली नाही. परंतु निवड करणाऱ्यांपैकी विजय मर्चंट यांनी अजूनही अंबरवर विश्वास होता. दिल्लीत मालिकेच्या तिसर्‍या कसोटीसाठी त्यांनी अंबरला परत बोलावले. या कसोटीत अंबरला फलंदाजीसाठी संधी मिळाली पण त्याला खाते देखील उघडता आले नाही.

अंबरचा हा बेजजाबाबदारपणा त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम करत होता. परंतु, अंबर अद्यारही तसाच होता. मजेत राहणारा लोड न घेणारा.  पुढचा सामना ईडन गार्डनवर झाला अंबरच्या स्वतःच्या होम ग्राउंडवर. पण तिथेही तो अयशस्वी ठरला.  या कसोटीत अंबरने 18 आणि 19 धावांचा डाव खेळला. ही कसोटी त्याच्या कारकिर्दीची शेवटची कसोटी ठरली.

फर्स्ट क्लास हिरो…पण, भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाले नाही…

वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करणारा अंबर आता बंगालचा कर्णधार होता. राज्यस्तरीय खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये परतल्यानंतर अंबरने आसामविरुद्ध 173 धावा केल्या. दोन सामन्यानंतर त्याने बिहारविरुद्ध 133 धावा केल्या. अंबरने राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये सतत वेगवेगळे विक्रम केले पण त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळवता आले नाही.

1972-73 मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. डेरेक अंडरवूड, टोनी ग्रेग, बॉब कॉटम आणि जैक बिर्केनशॉच्या समोर इस्ट झोनसाठी 70 धावा करत नाबाद सामना खेळला. त्यावेळी संपूर्ण संघ 148 वर ऑलआउट झाला होता. इतकेच नाही तर त्यानंतर मोइन-उद-दौला गोल्ड कपच्या फायनलमध्ये करसन घावरी, प्रसन्ना, सलीम दुर्रानी आणि पद्माकर शिवलकर यांसारख्या दिग्गजांच्या विरोधात स्टेट बँक ऑफ इंडियासाठी 124 आणि 37 असा स्कोर बनवला. 

त्यानंतर 1974-75 च्या रंजी ट्रॉफी क्वॉर्टरफाइनलमध्ये अंबर ने कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात 154 धावांसह नाबाद खेळी खेळली. कर्नाटकच्या त्या संघात प्रसन्ना आणि भगवत चंद्रशेखर हे दोघे खेळत होते.  

प्रतिभावंत खेळाडू

राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये मैदानाबाहेरही अंबरची एक वेगळीच छाप होती. असे म्हटले जाते की त्यावेळी अंबरच्या प्रत्येक स्ट्रोकवर संपूर्ण ईडन गार्डन त्याच्या पायाच्या बोटांवर उभे असे. परंतु या सर्व गोष्टींमुळे अंबरला कधीही फरक पडला नाही. त्याचा दृष्टीकोन वेगळा होता. 

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अंबर बंगालचा सिलेक्टर झाला. अंबरने 15 वर्षे बंगालचा सिलेक्टर म्हणून काम केले. असे म्हणतात की सौरभ गांगुलीमध्ये असेलेल्या खेळाडूला पहिल्यांदा पारखला तो अंबर रॉय ने. 1984 ते 1986 पर्यंत भारतीय संघाचे सिलेक्टर म्हणूनही त्यांनी काम केले. 1 जून 1945 साली जन्म झालेल्या अंबर रॉय यांचे 19 सप्टेंबर 1997 ला केवळ वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मृत्यू मलेरियामुळे झाला, परंतु बर्‍याच लोकांच्या मते त्यांना हृदयविकाराचा झटका आला.