शरद पवारांनी सख्या भावा विरोधात केला निवडणूक प्रचार.. काय होता निकाल?

शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आधारवड. अनेक वर्ष पवारांनी महाराष्ट्राचा राजकारण गाजवलं, अस बोलले जाते कि महाराष्ट्र मध्ये प्रत्येक मोठे निर्णय पवारांशी सल्ल्यानेच घेतले जातात व सर्वच राजकारणी त्यांचा आदर देखील करतात.

तसे पाहिले गेले तर पवारांच्या आयुष्यतील अनेक प्रसंग आहेत जे त्यांचे चाहते कधीच विसरू शकत नाही, जसा कि सातारातील खासदारकीची पोट निवडणूक, ह्याच प्रचारामध्ये त्यांचे पावसातले भाषण खूप गाजले व ह्याच भाषणमुळे सातारा लोक सभा हि काबीज केली. चला मग जाणून घेऊ असाच एक निवडणुकीचा किस्सा..

गोष्ट आहे १९५९ सालाची, काँग्रेस पक्षाचे अत्यंत वरिष्ठ सामानिनीय नेते केशवराव जेधे हे बारामती लोकसभेचे खासदार होते. १२ नोव्हेंबर १९५९ साली त्यांचे निधन व त्यानंतर लोकसभेची पोट निवडणूक जाहीर झाली. काँग्रेस पक्षासाठी हि निवडणूक खूप महत्वाची आणि प्रतिष्टेची होती. कारण अश्या दिग्गज नेत्या चा निधनानंतर हि जागा काँग्रेसनेच राखावी अशी काँग्रेस वरिष्ठांची इच्छा होती आणि त्या साठी काँग्रेसकडून पूर्णतः प्रयत्न केले जाणार होते.केशवराव जेधे ह्यांच्याच घरात उमीदवारी द्यावी अस ठरलं आणि केशवराव जेधेंची चिरंजीव गुलाब राव जेधे ह्यांना उमीदवारी देण्यात अली.

मित्रांनो त्या वेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात २ प्रमुख पक्ष होते, एक म्हणजे काँग्रेस आणि दुसरे शेतकरी कामगार पक्ष (शेकाप). शेकाप ची त्या वेळेस खूप मोठी ताकत होती आणि काँग्रेस च्या विरोधात असणारा प्रमुख पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि ह्या पक्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे स्थान होते. शेकाप ने देखील हि निवडणूक लाडवण्याचा ठरवलं आणि उमीदवारी जाहीर केली, त्यांचे उमेदवार होते वसंतराव पवार म्हणजेच शरद पवारांचे सख्खे थोरले बंधू, पवारांच्या कुटुंबतील बरेच सदस्य शेकाप पेक्षा मध्ये होते. स्वतः शरद पवारांचे मातोश्री शारधाबाई पवार शेकापच्या वरिष्ठ नेत्या होत्या आणि त्यांना एक मनाचा स्थान होते व त्या पुणे लोकल बोर्डचे सदस्य देखील राहिल्या होत्या.

पवार कुटुंबांची ताकत लक्षात घेऊन शेकाप ने शरद पवारांच्या थोरले बंधूंना उमेदवारी दिली. दोनी पक्षांसाठी हि निवडणूक प्रतिष्टेची बनवली होती एकीकडे काँग्रेसला हि जागा राखायची होती आणि शेकाप ला हि निवडणूक जिंकायची होती म्हणून दोन्ही पक्षाने इथे ताकत लावली होती, स्वतः आचार्य अत्रे, एस एम जोशी ह्यांनी शेकाप च्या उमेद्वारा साठी इथे ताकत लावली होती. काँग्रेसचा उमेदवार निवडून अनन्यसाठी स्वतः यशवंतराव चव्हाण, पवारांचे राजकीय गुरु ह्याने देखील त्यांची ताकत पणाला लावली होती.

इथे सर्वात दुविधा मनःस्तिथी आणि अडचण झाली ती म्हणजे शरद पवार यांची, एकी कडे घरातलाच उमेदवार स्वतःचे सखे थोरले बंधू शेकाप चे उमेदवार आणि दुसरी कडे त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण ने जाहीर केलेला उमेदवार केशवराव जेधे, म्हणून शरद पवार यांची दुविधा मनःस्तिथी होती. शरद पवारांच्या थोरल्या बंधूने हि दुविधा हेरली आणि शरद पवारांना बोलावून घेतला आणि समजावून सांगितलं कि तुमची जी दुविधा मनःस्तिथी मला माहित आहे व तुम्ही काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ता आहात हे मला समजते आहे म्हणून दुविधा मनःस्तिथी ठेऊ नका आणि तुम्ही तुमच्या पक्षाचा काम जोमानं करा, तुम्ही तुमच्या उमेदवाराचा प्रचार जोरदार करा आम्ही आमच्या पक्षाचा प्रचार करू, त्यामुळे कोणती शंका मनात ठेऊ नका आणि बिंदासपने तुम्ही तुमचं काम करा. स्वतः थोरले बंधू ह्यांनीच हि गोष्ट सांगितली म्हणून त्यांना थोडा बरं वाटलं आणि त्यांनी आपल्या पक्षाचा जोरात प्रचार केला आणि काँग्रेसने हि जागा मारली आणि जिंकून आले.

निष्टेचा फळ शरद पवारांना भेटले आणि तरुण नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आणि सर्वांच्या नजरेत आले व काही वेळाने ते आमदार हि झाले तेव्हा ते युवक काँग्रेस चे सेक्रेटरी होते