आपण २०२१ मध्ये पाहिले आहे की मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणी अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला आणि हे प्रकरण अजून देखील चालू आहे. तर मित्रांनो गृह मंत्रीचा राजीनामा घेण्याचा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही, असाच एक प्रकार २००८ ला सुद्धा घडला होता पण त्याची कहाणी थोडी वेगळी होती, वेगळी बोलण्या एवजी, ही कहाणी फिल्मी होती.
२००८ साली मुंबईवर देहशतवादी हल्ला झाला आणि पूर्ण भारत ह्या हल्ल्याने हादरले, सलग ३ दिवस आपले पोलीस दहशतवादी सोबत लढत होते आणि अखेर सर्व देहशतवादीला मारले व कसाब ला जिवंत पकडले.
हल्ल्यामुळे सर्व स्तरांतून तत्कालीन सरकारवर टीका सुरू झाली व केंद्र व राज्य सरकार बरखास्त कारणायचे देखील विधान केले गेले.
चला मग जाणून घेऊ काय होतं ते प्रकरण..
त्यावेळेस आर आर पाटील(आबा) हे राज्याचे गृहमंत्री होते आणि त्यांची प्रतीमा राजकारणात खूप चांगली होती. आबांचे गृहमंत्री असताना घेतलेले निर्णय खूप गाजले होते, जसे की डान्स बार बंद करण्याचा मुद्दा.
राष्ट्रवादीचे साफ प्रतिमा असलेले आर. आर पाटलांना २६/११ दहशतवादी हल्ल्या बद्दल परत्रकारांनकडून जाब विचारला गेला की येवढा मोठ्या हल्ल्याची कल्पना सरकारला कशी नव्हती, तर उत्तर म्हणून आबा “बडे बडे शेहरो मे, छोटे छोटे हादसे होते रेहते है” असे बोलून गेले.
ह्या मुद्द्यावरून विरोधकांनी राजीनामा मागायचा सूर लावला आणि अखेर शरद पवारांच्या बोलण्यावरून आर. आर पाटलांना गृहमंत्री पद सोडावे लागले.
तसे पाहिले गेले तर आर. आर पाटील मुळचे सांगलीचे व त्यांची हिंदी भाषेवर पकड नव्हती, तुम्ही जर त्यांचे जुने विडिओ पाहिले तर लक्षात येईलच. हिंदी बोलताना सतत वाक्यांमध्ये मराठी शब्द अस त्यांचे हिंदी असायचे.
आबांनी नंतर स्पष्ट देखील केले की त्यांना बोलायचे होते की मोठे शहर नेमहिच देहशतवादींचा निशाण असतात..