नोटांनी भरलेली एक बॅग घेऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली एक व्यक्ती थेट गृह राज्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन पोहचला व त्या व्यक्तीने आणलेली इतकी मोठी रक्कम त्याला गृह राज्यमंत्र्यांना लाच म्हणून द्यायची होती.
मग याच्यानंतर पुढे काय घडले हे आपण सविस्तर जाणुन घेऊयात..
तर साधारणपणे ही १९७८ वेळेची गोष्ट आहे, त्या वेळेस महाराष्टाचे मुख्यमंत्रीपद शरद पवारांकडे होते.
त्या वेळेस शरद पवरांच्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या पक्षांचा समाविष्ट होता, स्वत: शरद पवार त्या वेळेस काँग्रेसमधुन वेगळे होऊन काँग्रेस(S)ची स्थापना केली आणि त्यांच्या सोबत जनता पार्टी, शेकाप तसेच डावे पक्ष सोबत होते, अश्या विविध पक्षांची मोट बांधून नवीन सरकार स्थापन केले. पुरोगामी लोकशाही दलाचे नवीन सरकार महाराष्टात बनले व शरद पवार त्या वेळेस मुख्यमंत्री झाले व महाराष्टाच्या राजकारणातील काही मोठी मंडळी देखील शरद पवारांच्या मंत्रिमंडळात होती.
शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये त्या काळी गृह राज्यमंत्री होते भाई वैद्य. भाई वैद्य यांचा परिचय म्हणजे महाराष्ट्रातील एक अत्यंत अभ्यासु, विद्वान, आणि अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळख होती. भाई वैद्य हे पुण्याचे महापौर देखील राहिले होते.
तर झाले असे की गृहराज्यमंत्र्यांना एकेदिवशी एका व्यक्तीचा फोन आला आणि त्या व्यक्तीची पार्श्वभुमी ही गुन्हेगारी स्वरुपाची होती व व्यक्तीने भाईंना फोन करुन सांगितले की त्याच्यावरती एक केस सुरू आहे आणि त्याप्रकरणात त्याला अटक केली जाणार आहे व ही अटक टाळण्यासाठी तो हवे ते करायला तयार देखील आहे, असे म्हणत त्यांनी भाईंना दोन लाख रूपयांची आँफर दिली.
त्या काळातले दोन लाख रूपये म्हणजे आजच्या काळातील किमान काही कोटी आणि ही आँफर ऐकुण भाई प्रचंड अस्वस्थ झाले, एखादी गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेली व्यक्ती आपल्याला फोन करते आणि अमुक अमुक काम करवून घेण्यासाठी आपल्याला समोरून स्वता आँफर देते, अशावेळी काय करावे? हे कळत नसताना भाई वैद्य यांनी त्यांचे राजकीय गुरू एस एम जोशी यांना फोन लावला व त्यांना सांगितले की एका व्यक्तीचा फोन आला आणि तो असे म्हणत होता की मी जर त्याची अटक टाळण्यास गृहराज्यमंत्री म्हणुन जर मदत केली तर तो मला दोन लाख द्यायला तयार आहे. मी काय करावे? मला हे कळत नाहीये अशा परिस्थितीत काय करावे?तुम्ही मला सांगा.
त्यावर एस एम जोशींनी त्यांना सल्ला दिला की अश्या व्यक्तीला फक्त शिक्षाच झाली नाही पाहिजे तर त्याला रंगेहाथ पकडुन देखील दिले पाहिजे, हे ऐकुण भाई वैद्य यांनी मुंबईचे त्यावेळीचे क्राईम ब्रांचचे प्रमुख असलेले ज्युलियो लिबेरो यांच्याशी संपर्क साधला आणि झालेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घालत सांगीतले की त्यांना ह्या व्यक्तीला रंगेहाथ पकडुन द्यायचे आहे, त्यासाठी आपण काहीतरी सापळा रचायला पाहिजे जेणेकरून तो आपल्या जाळयात सापडेल आणि ही कारवाई आपल्याला अत्यंत गुप्त पदधतीने करायची आहे व त्यासाठी भाईंनी त्यांच्या बंगल्याभोवती लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचा सापळा रचत त्या व्यक्तीला त्यांच्या बंगल्यावर बोलवुन त्याला कुठल्या प्रकारची मदत त्यांच्याकडून हवी आहे तसेच कुठल्या केसबददल अटक टाळायची आहे याची विचारणा केली आणि त्यांनी विचारणा करताच त्या व्यक्तीने त्याच्याजवळ असलेली भरलेल्या नोटांची बँग त्यांच्या समोर ठेवली आणि त्याने असे करताच लाचलूचपत प्रतिबंधक शाखेने त्याला रंगेहाथ पकडुन त्याला अटक केली.
ह्या घडलेल्या प्रकाराबाबत खुप चर्चा महाराष्टाच्या राजकारणात झाली. एक अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा गृह राज्यमंत्री आपल्याला दिली जाणारी लाच आणि आपल्याकडून कोणीतरी काही गैरकृत्य करुन घेते आहे, हे थांबवण्यासाठी भाई वैद्य यांनी त्या व्यक्तीला रंगेहाथ पकडुन दिले त्याचे काम तर केलेच नाही.पण तातडीने त्याला तिथेच अटक करवुन दिली आणि एका मोठया गुन्हयाला त्यांनी आळा बसविला.
अश्यापद्धीतीने भाई वैद्य यांनी त्यांच्या ह्या एका कृतीतुन समाजासमोर एक आदर्श ठेवला की आपण गुन्हेगारी प्रवृत्तीला फक्त विरोधच न करता त्याला समुळ नष्ट करणे देखील गरजेचे आहे.