वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्नगाठ बांधणार नाही..

आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिवस, १ मे १९६० रोजी आपल्या महाराष्ट्राला राज्य म्हणून घोषित केले गेले व १०७ हुतात्मांनी ह्या चळवळीत भाग घेऊन आपल्या प्राणाची आहुती दिली. हा लढा सोप्पा नव्हता कारण ह्या लढ्या मध्ये पूर्ण देश ढवळून निघाला आणि ह्याची चर्चा थेट दिल्ली ते गल्ली पर्यंत सुरु होती.

असाच एक लढा दबक्या आवाजात खूप वर्षांपासून सुरु आहे, तो म्हणजे वेगळा विदर्भ, अनेक नेते मंडळीने हि मागणी लक्षात घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न देखील करतात व त्याचा सतत पाठपुरावा फक्त निवडणुकीच्या वेळेस करत असतात. महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने भाजप पक्षाने विदर्भातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा दिला व त्या मुद्द्यावरून निवडणुका देखील लढवल्या.

त्याच मुद्द्यावरून एक किस्सा देखील आज इंटरनेट वर खूप गाजत आहेत तो म्हणजेच आपल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचा लग्न गाठ नाही बांधण्याचा प्रण. होय, देवेंद्र फडणवीस ह्यांनी २००४ साली असा प्रण घेतला होते कि “वेगळा विदर्भ होत नाही तो पर्यंत लग्न गाठ बांधणार नाही”. पण हे प्रण मोडले गेले व देवेंद्र फडणवीस ह्यांनी २००५ साली लग्न केले. ह्या प्रण चा खूप लोकांना विसर पडला असेल बहुतेक हे देवंद्र फडणवीस ह्यांना देखील आठवत नसेल कि २०१३ मध्ये वेगळ्या मुद्द्यवरून मतदान देखील केले.

आता फडणवीस यांचे लग्न होऊन बरेच वर्षे झाले आणि ते ५ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. पण स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एकदा सुद्धा काढला नाही. काँग्रेस पक्षा सारखेच त्यांनी विदर्भाच्या जनतेच्या भावनांशी खेळ केला.

निवडणुकीच्या वेळेस केंद्रीय मंत्री गडकरी यांनी असे म्हणटले होते कि भाजपची सत्ता जर केंद्रात आली तर भाजप स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करेल असे त्यांनी म्हणटले होते. पण भाजपची सत्ता येताच विर्दभातील भाजप नेत्यांनी
वेगळा विदर्भाचा मुद्धा उचललाच नाही. काँग्रेसपेक्षा जास्त भाजपच्या नेत्यांनी विदर्भाच्या लोकांची मोठी फसवणूक केली आहे, असा आरोप केला जातो.