तुमच्यापैकी बऱ्याच वाचकांना साधारण या लेखात देत असलेल्या माहितीची पूर्व कल्पना असेलच. परंतु, समाजतला नव्या वाचक वर्गाच्या ज्ञानात भर घालण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिनींनो सरकारी वाहन आपल्या जवळून गेले आणि त्यावर तिरंगा ध्वज दिसला तर अगदी शालेय जीवनापासूनच आपल्याला टाचा वर करुन पहायाची सवय असतेच. मग ही गाडी कुणाची असेल? आत कोण मंत्री असेल का? की कोण अधिकारी असेल बरं? असे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत.तर भारतीय ध्वज संहिता, 2002 मध्ये नमूद केल्यानुसार गाडीवर राष्ट्रीय ध्वज लावणारे मान्यवर कोण आहेत ते आज आपण जाणून घेऊ…
देशाचा राष्ट्रीय ध्वज हा प्रत्येकाच्या राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. भारताचा तिरंगा हा भारत एक सार्वभौम देश असून तुम्ही त्या देशाचे नागरिक आहात याची जाणीव करुन देतो. परंतु, देशातल्या प्रत्येका अभिमान असला तरीही राष्ट्रीयध्वज हा काही महत्वाच्या व्यक्तींनाच स्वत: च्या गाडीवर फडकविण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे आपल्या देशात केवळ काही मान्यवरांनाच ही परवानगी आहे.
खालीलप्रमाणे महत्वाच्या व्यक्तींना आहे राष्ट्रीय ध्वज गाडीवर लावण्याची परवानगी-
- भारताचे राष्ट्रपती
- भारताचे उपराष्ट्रपती
- राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर
- परदेशातील भारतीय दूत
- पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री
- केंद्रीय राज्यमंत्री आणि उपमंत्री
- राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे इतर कॅबिनेट मंत्री
- राज्य सरकारमधील राज्यमंत्री आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपमंत्री
- लोकसभेचे अध्यक्ष
- राज्यसभेचे उपसभापती
- लोकसभेचे उपसभापती
- राज्यांमधील विधानपरिषदेचे सभापती
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधानसभेचे सभापती
- राज्य विधानपरिषदेचे उपसभापती
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधानसभेचे उपसभापती
- चीफ जस्टिस ऑफ इंडिया
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
- उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश
- उच्च न्यायालयांचे न्यायाधीश