1982 साली इराकमध्ये झालेल्या नरसंहारामुळे 2003 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सद्दाम हुसेन बद्दल काही रोचक गोष्टी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेने फाशीपूर्वी सद्दाम हुसेनच्या संरक्षणात तैनात केलेले बारा अमेरिकन सैनिक हे फक्त त्याचे चांगले मित्र नव्हते तर त्याचे शेवटचे मित्र होते. सद्दामबरोबर त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असणार्या 551 मिलीट्री पोलीस कंपनीतून निवडलेल्या या सैनिकांना ‘सुपर ट्वेल्व्ह’ असे संबोधले गेले.
त्यापैकी एका, विल बार्डेनवर्पर यांनी ‘द प्रिज़नर इन हिज़ पॅलेस, हिज़ अमेरिकन गार्ड्स, अँड व्हाट हिस्ट्री लेफ़्ट अनसेड’ हे पुस्तक लिहिले आहे. ज्यामध्ये त्याने सद्दामचे संरक्षण करताना त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये घडलेल्या घटनांचा उल्लेख केला आहे.
बार्डेनवर्पर सांगतात जेव्हा सद्दामला फाशी देणाऱ्या व्यक्तींकडे सोपविण्यात आले तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या सर्व जवानांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
सद्दाम आजोबांसारखा दिसे
बार्डेनवर्पर यांनी त्यांचा एक सहकारी अॅडम रॉजर्सनचा हवाला देत म्हटले आहे की, ‘आम्ही सद्दामला मनोविकृत खुनी म्हणून कधी पाहिले नाही. तो आम्हाला आमच्या आजोबांसारखा दिसत होता.
सद्दामवर त्याच्या 148 विरोधकांना ठार मारण्याच्या आदेशावरून खटला चालविला गेला.
त्याने आपले शेवटचे दिवस इराकी कारागृहात अमेरिकन गायिका मेरी जे ब्लीझा यांचे गाणे ऐकत घालवले.
त्याला गोड खाण्याची खूप आवड होती आणि नेहमी तो मिठाई खाण्यास उत्सुक असायचा.
बार्डेनवर्पर लिहितात की सद्दामची शेवटच्या दिवसांत लोकांबद्दलची वागणूक अतिशय सभ्य होती आणि आपल्या काळात तो अत्यंत क्रूर शासक असावा असे त्याने कधीही जाणवू दिले नाही.
कॅस्ट्रोने मला सिगार पिण्यास शिकवले
सद्दामला ‘कोहिबा’ सिगार पिण्याची आवड होती. जी तो ओल्या पेटीत ठेवत असे. तो म्हणत असे की काही वर्षांपूर्वी फिडेल कॅस्ट्रोने त्याला सिगार पिण्यास शिकवले.
निसर्गप्रेमी सद्दाम होता जेवणाच्या बाबतीत संवेदनशील
सद्दाम त्याच्या जेवणाबद्दल खूप संवेदनशील असायचा. तो त्याचा नाश्ता व्यवस्थित करत असे. प्रथम ऑमलेट, नंतर मफिन आणि नंतर ताजी फळ. जर त्याचे ऑमलेट चुकून बनवताना तुटले गेले तर तो ते खायला नकार देई.
बार्डेनवर्पर यांनी असे वर्णन केले आहे की सद्दामला बागकाम करण्यास खूप आवडत असे आणि तुरूंगाच्या आवारात वाढणारी झाडे-झुडुपेसुद्धा त्याला सुंदर फुलासारखी वाटत असतं.
बार्डेनवर्पर लिहतात की एकदा सद्दामने आपला मुलगा उदयच्या क्रौर्याबद्दल एक भयानक किस्सा सांगितला होता आणि यावेळी हे सांगताना सद्दाम संतापाने लालबुंद झाला होता.
झालं असं की उदयने एका पार्टीत गोळीबार केला होता, त्यामुळे बरेच लोक मरण पावले होते आणि बरेच जखमी झाले होते. यावर सद्दामला इतका राग आला की त्याने उदयच्या सर्व गाड्यांना आग लावण्याचे आदेश दिले. हा किस्सा सांगताना मध्येच सद्दाम हसला आणि त्याने उदयच्या महागड्या रोल्स रॉयस, फेरारी आणि पोर्श गाड्यांचा संग्रह कसा पेटविला आणि त्यातून पेट घेतलेल्या ज्वाला कशा निरखून पहिल्या याविषयी त्याने यावेळी सांगितले.
दिलदार सद्दाम
सद्दामच्या सुरक्षेसाठी असलेल्या एका अमेरिकन सैनिकाने त्याला सांगितले की त्याचा भाऊ मरण पावला आहे. हे ऐकून सद्दामने त्या सैनिकाला मिठी मारली आणि म्हणाला, ‘आजपासून तू मला तुझा भाऊ मान.’
सद्दामने दुसऱ्या एका सैनिकास सांगितले की, जर मला माझे पैसे वापरण्याची परवानगी दिली गेली तर मी तुझ्या मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा संपूर्ण खर्च करेन.
सैनिकाला सूट दिला भेट
एका रात्री सर्वांनी एक वीस वर्षांचा सैनिक, डॉसन विचित्र आकाराच्या सूटमध्ये फिरत असल्याचे पाहिले. सद्दामने डॉसनला भेट म्हणून त्याचा सूट दिला आहे असे सर्वांना माहिती झाले. बार्डेनवर्पर लिहितात की, ‘बरेच दिवस आम्ही डॉसनवर हसलो. कारण तो हा सूट घालून एखाद्या फॅशन शोसाठी’ कॅटवॉक ‘करत चालत असल्यासारखे चालत असे. सद्दाम पासून दूर राहण्याचे स्पष्ट आदेश देऊनही सद्दाम आणि त्याचे रक्षण करणारे पहारेकरी यांच्यात मैत्री वाढतच गेली. खटल्याच्या वेळी हुसेनला दोन तुरूंगात ठेवण्यात आले होते.
सदर पुस्तकात एक धक्कादायक किस्सा लिहिण्यात आला आहे. तो म्हणजे, सद्दामच्या फाशी नंतर अमेरिकन लष्करातील काही जवानांनी बेकायदेशीर दुःख व्यक्त केले होते. तो अमेरिकेचा कट्टर शत्रू असताना देखील या शोकसभा घेण्यात आल्या होत्या.
त्या सैनिकांपैकी एक, अॅडम रॉजर्सन यांनी विल बार्डेनवर्पर यांना सांगितले की ‘सद्दामला फाशी दिल्यावर आम्हाला वाटले की आम्ही त्याचा विश्वासघात केला आहे. आम्ही स्वतःला त्याचे मारेकरी मानत होतो. आम्हाला वाटले की आपण जवळच्या व्यक्तीला मारले आहे. सद्दामला फाशी देण्यात आली, जेव्हा त्याचा मृतदेह बाहेर काढला गेला, त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या लोकांनी त्याच्यावर थुंकले आणि त्याच्याशी गैरवर्तन केले.