१४ जानेवारी १७६१, पानिपत च्या रणांगणावर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठे आणि अफगानचे आक्रमक अहमदशाह अब्दाली ह्या दोघांच्या फोज्जा भिडल्या, आपल्याला सर्वांना हा युद्ध झाला आणि मराठे हरले हे माहित आहे. पण हा युद्ध हरायचे नेमके कारण काय होते. चला मग जाणून घेऊ आजच्या लेखात..
निसर्गाची साथ नाही लाभली.
मराठा सैन्य नोव्हेंबर १७६० मध्ये पानिपत मध्ये आले. उत्तरेचे कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी मराठ्यांकडे पुरेशे गरम कपडे नव्हते या उलट अफगाण सैन्य कडे चामड्याच्या कोट सारखे कपडे असल्यामुळे ते हि थंडी सहन करून शकले असा इतिहासक बोलतात..
सूर्याने दिशा बद्दली आणि..
ह्या युद्धात सुर्याची दिशा महत्त्वाची ठरली जसा सूर्य माथ्यावर यायला लागला तसे आधिच पाण्याची गरज असलेलं मराठा सैन्य आणखी हैराण होयला लागलं असे इतिहास अभ्यासक बोलतात….
व्यूहरचना
मराठ्यांना सवय होती ती म्हणजे गनिमीकाव्यची आणि पानिपतचा मुलुख मैदिनी आहे म्हणजे सपाट मैदान. मराठयानी इथे गोलाची लढाई करण्याचे ठरविले, गोलाची लढाई म्हणजे तोफखाना सगळ्यात पुढे ठेवायचा आणि घोरदाळ आणि पायदळ ह्यांचा गोल करून पुढे सरकत जायचं, अश्या प्रकारच्या लढाईची सवय मराठे सैन्यला नव्हती. इब्राहिम खान गारदीच्या नेतृत्वाखाली तोफखानेचा वर्षाव सुरु केला आणि अब्दालीच्या सैन्याला पेचात पाडले व सरदार विंचूरकरांनच्या तुकडीने गोल मोडून शत्रूवर चाल केली, मराठा सैन्य ला हानी होऊ नये म्हणून इब्राहिम खान गारदीने तोफखाना थांबवल्या आणि ह्याचाच फायदा घेऊन अब्दालीने उंटावर बसवलेल्या हलक्या तोफा पुढे आणल्या आणि मराठा सैनिकांवर हल्ला केला..
रिकामी अंबारी
अनेक इतिहासकार सांगतात की विश्वासराव खाली पाडल्या नंतर सदाशिवराव भाऊ आंबरीतीतून उतरले आणि घोड्यावर बसले. अंबारी रिकामी दिसल्यावर भाऊ सुद्धा पडल्याची बातमी मराठा सैन्यात पसरली आणि साहजिकच सैन्यचा मनोबल धैर्य खचले.
राखीव सैनिक
इतिहासक सांगतात की मराठ्यांचा सगळं सैन्य एकदम निघालं आणि लढले पण अब्दालीकडे १०००० राखीव सैन्य होत. मराठे वरचढ ठरत्यात हे पहिल्या नंतर अब्दालीच्या राखीव व ताज्या दमाचा सैन्य मैदानात उतरवलं आणि त्यानंतर मराठा सैन्यातले काही सरदारांनसह अनेक सैनीकांनी सुध्दा युद्धातून काढता पाय घेतला, असे बोलले जाते.
इतरांची बघ्याची भूमिका
मुळात ही लढाई झाली कारण अहमदिया करारा नुसार दिल्ली च्या बादशाहहीच्या रक्षनाची जबाबदारी मराठ्यांची होती त्याचा मोबदला म्हणून चौताई कर वसुलीचा आणि देशमुखीचा अधिकार सुद्धा मराठयांना मिळाला, ह्या पूर्वी हा अधिकार राजपुतांकडे होता, ते हातचे गेले म्हणून राजपुतांनी मराठयांना ह्या लढाईत मदत केली नाही…
बुणगे (न लढणारे यात्रेकरू, स्त्रिया व मुले)
अब्दाली बरोबर फक्त त्याचे सैनिक होते, पण ह्या उलट मराठा सैन्या बरोबर यात्रेकरू, व्यापारी आणि कुटुंब असे किमान २ ते ३ लाख बिन लढाऊ लोक होते, ह्या सगळ्या ना पोसण्यात मराठा सैन्य वर प्रचंड ताण आला, प्रत्येक्ष पानिपत पोहचे पर्यंत ह्या बिन लढाऊ लोकांच्या संत गतीमुळे सैन्याच्या वेगावर अनेक मर्यादा आल्या.
तर मित्रांनो हे कारण होते..