महात्मा गांधीं यांनी भगत सिंग यांना का नाही वाचवले…?

एक आदर्श क्रांतिकारक म्हणून परिचित, भगतसिंग हिंसाचाराच्या मार्गावर चालून स्वातंत्र्य मिळविण्याचे समर्थक होते, त्यांचा जन्म 1907 मध्ये झाला जेव्हा महात्मा गांधीं जींचे वय 38 वर्ष होते. त्यावेळी मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेत अहिंसक संघर्षाचा प्रयोग करीत होते.

सत्याग्रहाचा अनुभव घेऊन गांधी 1915 साली भारतात आले. भारतात येताच ते भारतातील राजकीय व्यक्ती बनले. त्याच वेळी तरुण भगतसिंगांनी हिंसक क्रांतीचा मार्ग स्वीकारला. परंतु या दोघांमध्ये बर्‍याच गोष्टीचे साम्य होते. ज्यामध्ये देशातील गोरगरीबांच्या हिताला महत्त्व देणेही होते.

त्यांची स्वातंत्र्य कल्पना फक्त राजकीय नव्हती. दोघांनाही हवे होते की देशातील लोक शोषणाच्या बंधनातून मुक्त व्हावेत आणि त्यांचे प्रयत्न या दिशेने असले पाहिजेत. दोघांमध्ये एक गोष्ट विरोधाभासी होती पण तरीही त्या दोघांमध्ये काही समानता होती.

भगतसिंग नास्तिक होते आणि गांधीजी प्रचंड आस्तिक होते. परंतु दोघेही धर्माच्या नावाखाली पसरलेल्या द्वेषाला विरोध करीत होते.

भगत सिंग ची फाशी थांबवता अली असती?

1928 साली सायमन कमिशनच्या विरोधात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते लाला लाजपत राय यांना पोलिसांनी काठीने  मारून जखमी केले. काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. भगतसिंग लालाजींच्या आयुष्यातील शेवटच्या वर्षांच्या राजकारणाशी सहमत नव्हते आणि त्यांनी त्यांचा उघडपणे विरोध केला.

पण ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्याच्या काठीने जखमी झालेल्या लालाजींची अवस्था पाहून भगतसिंग फार संतापले. याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग यांनी आपल्या साथीदारांसह पोलिस अधीक्षक स्कॉटची हत्या करण्याची योजना आखली. परंतु जोडीदाराच्या चुकीमुळे, 21 वर्षीय पोलिस अधिकारी saundersचा स्कॉटऐवजी मृत्यू झाला.

या प्रकरणात भगतसिंग यांनी पोलिसांना चकवा दिला. पण थोड्या दिवसांनी त्यांनी विधानसभेच्या सभागृहात बॉम्ब फेकला. त्यावेळी सरदार पटेल यांचे थोरले बंधू विठ्ठल भाई पटेल हे पहिले भारतीय सभापती म्हणून विधानसभेचे कामकाज चालवत होते. भगतसिंग यांना लोकांचे नुकसान करायचे नव्हते, परंतु त्यांना देशातील परिस्थितीचा आवाज ब्रिटिश सरकारच्या कानावर पोहोचवायचा होता. बॉम्ब टाकल्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त पळून जाऊ शकले असते, परंतु त्यांनी स्वतःला पोलिसांच्या हवाले केले.

अटकेच्या वेळी भगतसिंग यांच्या सोबत रिव्हॉल्व्हर होते. काही काळानंतर हे सिद्ध झाले की पोलिस अधिकारी saundersच्या हत्येमध्ये याच रिव्हॉल्व्हरचा वापर केला गेला होता. म्हणूनच,  विधानसभेत बॉम्ब टाकण्याच्या आरोपावरून पकडण्यात आलेल्या भगतसिंग यांना saunders हत्येच्या गंभीर प्रकरणात फाशी देण्यात आली.

गांधीजी आणि शिक्षा माफी..

1930 मध्ये दांडी यात्रेनंतर कॉंग्रेस आणि ब्रिटिश सरकार यांच्यातला संघर्ष जोरात सुरू होता. दरम्यान, ब्रिटीश सरकारने वेगवेगळ्या नेत्यांना लंडनला येण्यासाठी निमंत्रण दिले. भारताच्या राजकारणातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत गांधीजी आणि कॉंग्रेस सहभागी झाले नव्हते आणि ही परिषद काहीच उपयोगाची ठरली नाही.

दुसर्‍या परिषदेत ब्रिटीश सरकारने पहिल्या परिषदेसारखी गोची टाळण्यासाठी संवादाचा मार्ग अवलंबण्याचे ठरविले. व्हाईसरॉय इरविन आणि गांधीजी यांच्यात 17 फेब्रुवारी 1931 पासून बोलणी सुरू झाली. यानंतर 5 मार्च 1931 रोजी या दोघांमध्ये करार झाला. या करारामध्ये अहिंसक संघर्षाच्या वेळी पकडलेल्या सर्व कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा भोगत असलेल्या भगतसिंगला माफी मिळू शकली नाही.

भगतसिंगसह इतर सर्व कैद्यांना अशा प्रकरणात माफी मिळू शकली नाही. येथून वाद सुरू झाला.

महात्मा गांधीं चा विरोध

यादरम्यान, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला की जेव्हा भगतसिंग आणि त्यांच्या इतर साथीदारांना शिक्षा दिली जात आहे, तर मग ब्रिटीश सरकारशी कशी तडजोड होऊ शकेल. या विषयाशी संबंधित प्रश्नांसह, भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी पत्रके वाटण्यात आली. कम्युनिस्टांना या कराराचा राग आला होता आणि त्यांनी जाहीर सभांमध्ये गांधीजींचा निषेध करण्यास सुरवात केली.

अशा परिस्थितीत 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. परंतु हा संताप केवळ ब्रिटिशांवरच नव्हता तर गांधीजींच्या विरुद्धही होता कारण त्यांनी ‘भगतसिंगला फाशी दिली तर तडजोड होणार नाही’ असा आग्रह त्यांनी धरला नाही.

26 मार्च 1931 रोजी कराची येथे कॉंग्रेसचे अधिवेशन सुरू झाले ज्यामध्ये ‘सरदार पटेल पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले.’ 25 मार्च रोजी गांधीजी या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी तेथे पोहोचले. तेव्हा त्यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. काळ्या कपड्याने बनवलेल्या फुलांनी आणि गांधी मुर्दाबाद-गांधी गो बॅक अशा घोषणा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. गांधींनी त्यांच्या निषेधाचे सौम्य प्रदर्शन म्हणून वर्णन केले आणि ते म्हणाले की, ‘या लोकांनी आपला राग अत्यंत शांतपणे दाखविला’.वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार, 25 मार्च रोजी दुपारी बरेच लोक गांधी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी पोहोचले. अहवालानुसार ‘हे लोक’ मारेकरी कुठे आहे ‘अशी घोषणा देऊ लागले.

मग ते लोक जवाहरलाल नेहरूंना भेटले ज्यांनी या लोकांना तंबूत आणले. यानंतर, तीन तास बोलल्यानंतर त्यांनी या लोकांना समजावून सांगितले पण संध्याकाळी हे लोक पुन्हा निषेधावर परतले. सुभाषचंद्र बोस यांच्यासह कॉंग्रेसमधील अनेकांनी गांधीजी आणि इर्विन यांच्यातील कराराला विरोधही केला. त्यांना असे वाटत होते की ब्रिटिश सरकार भगतसिंगच्या फाशीची शिक्षा रद्द करीत नसल्यास तडजोड करण्याची गरज नाही. तर दुसरीकडे कॉंग्रेस कार्यकारिणी गांधीजींच्या पूर्णपणे समर्थनात होती.