जगभरात रत्नांमध्ये मौल्यवान रत्न असलेला कोहिनूर हिरा हा जगातल्या गर्भ श्रीमंत व्यक्तीला ही खरेदी करणे शक्य नाही. कारण, हा हिरा आजपर्यंत पैशांच्या नाहीतर सत्तेच्या बळावर हस्तगत केला गेलाय. कोहिनूरचा इतिहास पहायला गेलं तर तो फारच रंजक आहे. आज आपण थोडक्यात जाणून घेतोय कोहिनूर बद्दल…
कोहिनूर हे जगातले प्रसिद्ध रत्न आहे. या हिऱ्याच वजन 105.6 कॅरेटचा असून त्याचे वजन 21.6 ग्राम आहे. सुरुवातीला कोहिनूर 186 कॅरेटचा होता. मात्र, हा हिरा ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी त्याला पैलू पाडले.त्यामुळे या हिऱ्याच्या वजनात घट येऊन त्याचे वजन 105.6 कॅरेट इतके कमी झाले. हा हिरा भारतातील गोलकुंडाच्या खाणीत सापडला होता. गोलकुंडा हे आत्ताच्या दक्षिण भारतातील हैद्राबाद पासून 5 मैल अंतरावर आहे. कोहिनूर म्हणजे लख्ख प्रकाशाचा पर्वत.कोहिनूरच्या गुणधर्मामुळे त्याचे हे नाव पडले आहे असे म्हटले जाते.
कोहिनूरच्या दंत कथा-
अनेक लोकांच्या मते हा हिरा ज्या राजा महाराजांनी आपल्या जवळ ठेवला त्यावेळी त्या पुरुष राजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचे साम्राज्य लयाला गेले. काहिंना राजगादी गमवावी लागली अशा प्रकारे त्यांचे मोठे नुकसान झाले असे म्हटले जाते. काहींनी या कोहिनूर मुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, हा हिरा कोणत्याही महिलेजवळ म्हणजे राणीजवळ राहिला तर तिला नेहमीच प्रसिद्ध, ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त होऊन तिच्यासाठी तो लाभदायी ठरला आहे. तर काहिंच्या मते कोहिनूर सर्वांसाठीच लाभदायी ठरला आहे.
प्राचीन कथांमध्ये उल्लेख केलेला खडा कोहिनूर आहे का?
कोहिनूर हा 5 हजार वर्षांपूर्वी मिळाला होता. प्राचीन संस्कृतमध्ये या कोहिनूरला स्तमंतक मनी असे म्हटले जात असे. हिंदू कथांच्या मान्यतेनुसार हा हिरा भगवान श्रीकृष्णाने जांभूवंताकडून घेतला होता. तर काहींच्या मते हा हिरा नदी तळाशी सापडला होता. मात्र, ऐतिहासिक पुराव्यानुसार हा हिरा गोलकुंडाच्या खाणीतून बाहेर काढण्यात आलेला आहे.
राजऐतिहासिक कोहिनूर –
अनेक राजांकडे हा हिरा असल्याचे इतिहासात आढळते. खिलजी, बाबर, हुमायु, अकबर पण ज्या राजाकडे हा हिरा राहिला राजाच्या राज्याचा अस्त झाला. 1294 च्या सुमारास हा हिरा ग्वाल्हेरच्या राजाकडे होता असे म्हटले जाते. त्यानंतर 1300 -1351 पर्यंत हा हिरा मोहम्मद बीन तुगलक या राजाकडे राहिला.नंतर शहाजानने हा हिरा आपल्या मयुर सिहासनामध्ये बसवला.
हिरा इंग्लंडला पोहचला कसा-
जवळपास 1800 साली महाराजा रणजितसिंहकडे हा कोहिनूर होता. ते नेहमी कोहिनूर आपल्या जवळ ठेवत असतं. महाराजा रणजितसिंहच्या निधनानंतर तो हिरा वारसा हक्काने त्यांच्या मुलाकडे राहिला. पंजाबमध्ये ब्रिटिशांनी सत्ता प्रस्तापित केल्यानंतर गव्हर्नर लॉर्ड डलहौजी या इंग्रज गव्हर्नरने राणी व्हिक्टोरीयाकडे इंग्लंडला पाठवला. त्यानंतर 1911 साली इंग्लंडची महाराणी मेरीच्या मुकुटात बसविण्यात आला. तो अद्याप तसाच आहे. पुढे कोहिनूर लंडनच्या टॉवर ऑफ लंडन या संग्रहालयात लोकांना दाखविण्यासाठी ठेवण्यात आला. दरम्यान हा हिरा भारतात परत आणण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आला मात्र ते पुन्हा शक्य झाले नाही आणि कोहिनूरवर सध्या इंग्रजांच्या ताब्यात आहे.