औरंगजेबाच्या कैदेतून कसे सुटले छत्रपती शिवाजी महाराज?

दक्षिणेत मिर्झाराजे जयसिंग यांनी विढा उचलला होता की कसेही करून ते शिवाजी महाराज यांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे घेऊन येतील. परंतु हे सत्यात उतरणे तितके सोपे नव्हते. शिवाजी महाराजांनी काही दिवस आधी मुगल राजांना भेटणे त्यांना महत्त्वाचे वाटत नसल्याचे म्हटले होते. यामागे काही महत्त्वाची कारणे देखील होती. कारण शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या शब्दावर विश्वास नव्हता. शिवाजी महाराजांना हे चांगलेच माहिती होते की औरंगजेब आपला उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. 

लेखक यदुनाथ सरकार आपले पुस्तक ‘शिवाजी अँड हिज टाईम’मध्ये लिहितात, मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना विश्वास दिला की विजापूर आणि गोवळकोंडच्या मोहिमेसाठी औरंगजेब त्यांना सैन्य देईल. सत्य परिस्थिती मध्ये मात्र औरंगजेबाने असे कोणतेही वचन दिलेले नव्हते. तसे शिवाजी महाराजांना असे वाटत होते की औरंगजेबाच्या भेटीनंतर तो त्यांना विजापुरातून कर वसुलीचे अधिकार देईल. मराठ्यांच्या दरबारात यावर चर्चा झाली आणि निश्चित झाले की शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे जातील. 

5 मार्च 1666 ला शिवाजी महाराज आपल्या आई जिजामातांशी राज्यकारभारा विषयी महत्वपूर्ण चर्चा करून आग्रा येथे जायला निघाले. जयसिंग ने आपला मुलगा रामसिंहवर शिवाजी महाराजांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली. प्रवासासाठी येणाऱ्या खर्चाला औरंगजेबाने शिवाजी महाराज यांना एक लाख रुपये पाठवून दिले.

रस्त्यामध्ये शिवाजी महाराज यांना औरंगजेबाचे एक पत्र मिळाले..

प्रसिद्ध इतिहासकार एस एम पगडी आपले पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजमध्ये लिहितात,  या पत्रात असे लिहिण्यात आले होते की तुम्ही निसंकोचपणे आग्रा येथे आमच्या भेटीला या आम्ही तुम्हाला शाही सन्मान देऊ. त्यानंतर तुम्हाला सन्मानाने तुमच्या राज्यात परत पाठवले जाईल. मी आपल्यासाठी शाही पोशाख पाठवत आहे. 

9 मे 1666 ला शिवाजी महाराज आग्रा परिसरात पोहोचले. जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज असे म्हटले गेले तेव्हा मिर्झाराजे जयसिंगचा मुलगा रामसिंगने शिवाजी महाराजांना औरंगजेबासमोर हजर केले. मराठा साम्राज्याकडून भेट म्हणून औरंगजेबाला 2000 सोन्याच्या मोहरा आणि सहा हजार रुपये रोख रक्कम भेट म्हणून त्यावेळी देण्यात आली. औरंगजेबाने भेट स्वीकार केली आणि आपल्या जवळ असलेल्या एका सैनिकाच्या कानात तो काहीतरी पुटपुटला. त्यानंतर शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारातील तिसऱ्या फळीतल्या सरदारांमध्ये उभे करण्यात आले.महाराजांना अशा स्वागताची अपेक्षा नव्हती. 

यदुनाथ सरकार लिहितात, शिवाजी महाराजांना प्रचंड राग आला. त्यांना रामसिंग सारख्या व्यक्तीकडून आग्रा  बाहेर आपले स्वागत झाले हेच आवडले नव्हते. इतक्या दूर आल्यानंतर औरंगजेबाकडून दिल्या गेलेल्या वागणुकीमुळे राजे नाराज होते. दरबारात त्यांना साधारण मनसबदारांच्या शेवटच्या रांगेत उभे केल्यामुळे त्यांना औरंगजेब दिसतही नव्हता. यामुळे महाराजांना राग अनावर झाला होता. त्यांनी रामसिंगला विचारली की आम्हाला कोणत्या लोकांसोबत उभे केले आहे? जेव्हा रामसिंगने त्यांना सांगितले की ते पाच हजारी मनसबदार यांमध्ये उभे आहेत. हे ऐकून महाराज ओरडले आणि म्हणाले माझा सात वर्षांचा मुलगा आणि नेताजी पाच हजारी मनसबदारांमध्ये आहेत. इतक्या दूर आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी उभे केले आहे? महाराजांनी विचारले की माझ्यापुढे कोण सरदार उभे आहेत ? त्यावर रामसिंग म्हणाला, तुमच्या पुढे राजा रायसिंग सिसोदिया आहेत. 

औरंगजेबाच्या पहिल्या दहा वर्षांतील राजकीय कारकिर्दीवर लिहिलेले पुस्तक ‘अलमगीर नामा’मध्ये ‘मोहम्मद काझीम’ लिहितात की आपल्या अपमानामुळे नाराज झालेले शिवाजी महाराज मोठ्या आवाजात रामसिंगवर ओरडले. शिवाजी महाराजांकडून दरबाराच्या नियमांचे पालन न झाल्यामुळे रामसिंगने त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. परंतु, झालेल्या अपमानामुळे नाराज असलेले महाराज दरबारातून थेट बाहेर निघाले. त्यावेळी औरंगजेबाने विचारले की हा कसला आवाज आहे. यावर रामसिंह म्हणाला, वाघ जंगलातला प्राणी आहे. तो इतकी गरमी सहन करू शकत नाही.  तो आजारी पडला आहे. त्यामुळे तो आवाज करत आहे असे म्हटले. परंतु, काही वेळातच त्याने औरंगजेबाची माफी मागत म्हटले की दख्खन मधून आलेल्या या महाशयांना शाही दरबाराचे नियम आणि कायदे माहित नाहीत त्याबद्दल मी आपली माफी मागतो. त्यावर औरंगजेब म्हणाला शिवाजी महाराजांना बाजूच्या खोलीमध्ये घेऊन जा आणि त्यांच्यावर गुलाब पाण्याचा वर्षाव करा. त्यांना बरे वाटल्यानंतर त्यांना थेट त्यांच्या राहण्याची व्यवस्था केलेल्या जागी नेऊन पोहोचवा. त्यानंतर महाराजांना जयपूरमध्ये ठेवण्याचा आदेश दिला गेला. 

महाराज जयपूरमध्ये पोहोचताच त्यांना ठेवलेल्या जागेला औरंगजेबाच्या सैनिकांनी वेढा दिला. काही वेळातच काही सैनिक चालत त्यांच्या जवळ पोहोचले. त्यांनी शिवाजी महाराजांना ठेवलेल्या जागेच्या दरवाजाकडे सर्व तटबंदीसाठी असलेल्या तोफांची तोंड केली.

महाराजांना ठेवलेल्या महालातून त्यांना बाहेर पडण्यास बंदी होती. तरीही औरंगजेब त्यांना वारंवार संदेश पाठवत असे. औरंगजेबाने महाराजांसाठी अनेकदा फळांच्या टोपल्या देखील पाठवल्या. एकदा महाराजांनी औरंगजेबाच्या वजिराला पत्र पाठवले आणि म्हटले की औरंगजेबाने आम्हाला सुरक्षित परत पाठवण्याचे वचन दिले होते. परंतु, त्याचे अद्याप पुढे काहीच झालेले नाही. औरंगजेबाच्या अशा वागण्यामुळे शिवाजी महाराजांच्या हे लक्षात आले की औरंगजेब त्यांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामुळे तो महाराजांना मारू शकेल. (संदर्भ,डेनिस किंकेड-शिवाजी द ग्रेट रेबेल)

शिवाजी महाराजांवर नजर ठेवण्यासाठी औरंगजेबाने तैनात केलेल्या सैनिकांच्या हे लक्षात आले की शिवाजी महाराजांमध्ये काही वेगळे बदल होत आहेत. महाराज तैनात करण्यात आलेल्या सैनिकांसोबत हसत खेळत असत. ते तैनात केलेल्या सैनिकांना भेटवस्तू देऊ लागले. तसेच महाराज म्हणत असत मला येथील वातावरण मानवले आहे. तसेच महाराज म्हणाले, की आम्ही औरंगजेब बादशहाचे  आभार मानतो कारण ते आमच्यासाठी फळे आणि मिठाई पाठवत आहेत. आग्रासारख्या सुसंस्कृत शहरात राहून मला प्रचंड चांगले वाटत आहे. महाराजांच्या बोलण्यामुळे सैनिकांनी बादशाहाला कळवले कि शिवाजी सध्या प्रचंड संतुष्ट वाटत आहेत. 

काही दिवसातच महाराजांनी नाटक केले आणि म्हटले की मला बरे वाटत नाही माझी प्रकृती ठीक नाही. आपली प्रकृती ठीक व्हावी म्हणून ते शहराबाहेरील ब्राह्मण आणि साधूंना रोज संध्याकाळी मिठाई आणि फळे वाटू लागले. सुरुवातीचे काही दिवस महालातून बाहेर जाणाऱ्या वस्तूंची सैनिक तपासणी करु लागले. परंतु काही दिवसांनी त्यांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.

यदुनाथ सरकार आपले पुस्तक ‘शिवाजी अँड हिज टाईम’मध्ये लिहतात,19 ऑगस्ट 1666 ला शिवाजी महाराजांनी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना निरोप पाठवला की ते प्रचंड आजारी आहेत आणि बिछान्यावर पडून आहेत. त्यांच्या आरामात अडथळा येऊ नये याकरता कुणालाही आतमध्ये पाठवू नये. एकदिवस हिरोजी फर्जंद महाराजांची कपडे आणि दागिने घालून त्यांच्या जागेवर झोपले. यावेळी त्यांनी आपले संपूर्ण शरीर चादरेने झाकले होते केवळ त्यांचा एक हात बाहेर दिसत होता त्यामध्ये त्यांनी महाराजांचा सोन्याचा कडा घातला होता. त्यावेळी शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी राजे फळांच्या पेठाऱ्यात बसले आणि सैनिक ते घेऊन बाहेर निघाले. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांनी हे पेठारे तपासणे आवश्यक समजले नाही. शहरापासून काही अंतरावर या पेट्या घेऊन जाण्यात आल्या यानंतर पेठारे घेऊन येणाऱ्या लोकांना परत पाठवण्यात आले. शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे आग्रा पासून सहा मैल दूर असलेल्या एका गावात पोहोचले.

 यावेळी स्वराज्याचे मुख्य न्यायाधीश निराजी रावजी त्यांची वाट पाहत होते. तोपर्यंत फर्जंद दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत त्याठिकाणी झोपलेले होते. सैनिकांनी पाहिले तेव्हा बेडवर झोपलेल्या महाराजांच्या हातामध्ये त्‍यांना सोन्‍याचे कडे दिसले. तर पायाजवळ एक नोकर त्यांची सेवा करत असलेला दिसला. त्यामुळे महाराज झोपले आहेत असे त्यांना वाटले. दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता फर्जंद एका नोकरासोबत त्या ठिकाणाहून बाहेर पडले. त्यांनी सैनिकांना सांगितले की शिवाजी महाराज आजारी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तुम्ही आवाज करू नका. परंतु काही वेळ शिवाजी महाराजांच्या खोलीतून कोणताही आवाज न आल्यामुळे सैनिकांना शंका आली आणि ते खोलीत आले. तेव्हा त्याने पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की शिवाजी महाराजांच्या अंथरुणावर कोणीही नव्हते. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि औरंगजेबाच्या कानावर पडली. बातमी ऐकताच औरंगजेबाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर संतापलेल्या औरंजेबाने महाराजांना शोधण्यासाठी चारी दिशांना सैनिक पाठवले परंतु ते सर्व सैनिक खाली हात परत आले.

 शिवाजी महाराजांनी प्रचंड चलाखीने महाराष्ट्रात जाण्यासाठी उलटा रस्ता निवडला. ते मथुरेला जाऊन गोवळकोंडा वरून राजगडला पोहोचले. औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर केवळ सहा तासात ते मथुरेला पोहोचले. तिथे त्यांनी आपले केस दाढी मिशा काढल्या. संन्याशाचे रूप घेऊन ते डिसेंबर ला एक दिवस सकाळी स्वराज्यात पोहोचले. त्यावेळी जिजामाता आपल्या कक्षा मध्ये बसल्या होत्या. त्यांचा एक नोकर त्यांच्यासाठी एक संदेश घेऊन आला तो म्हणाला की एक संन्यासी आपल्याला भेटायला इच्छुक आहे. त्यांनी  संन्याशाला आत पाठवायला सांगितले. आज येतात त्या संन्याशाने जिजामाता यांचे पाय धरले. त्या म्हणाल्या वैरागी कधीपासून दुसऱ्यांचे पाय धरू लागलेत. त्यांनी संन्याशाला उठवले आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले चेहरा पाहताच जिजामाता जोरात ओरडल्या शिवबा.