एक मराठी माणूस होता गांधीजींचे राजकारणातील गुरु..

गांधीजींना जर कोण ओळखत नसेल तर तो माणूस आपल्या देशात शोधून सापडणे देखील दुर्मिळ आहे. अगदी कळायला लागल्यापासून चलनवलनाशी संपर्क आला तर तो व्यक्ती गांधीजींना ओळखतोच. कारण, आपल्या देशातल्या नोटांमुळे. शाळेत न जाताही गांधीजींचा परिचय होतो. तर देशासाठी शांतीच्या मार्गाने कार्य केलेल्या गांधींचा एक मराठी माणूस गुरु होता. ऐकायला नवल वाटत असेल तरीही ही गोष्ट खरी आहे. तर जाणून घेवूया महात्मा गांधींच्या या महाराष्ट्रातील मराठी गुरुबद्दल….

तर गोष्ट आहे 19 फेब्रुवारी 1915 ची. या दिवशी गोपाळकृष्ण गोखले यांचे मुंबईत निधन झाले. अवघ्या 48 वर्षांच्या गोखलेंचे सतत प्रवास आणि समाजकारणातील सक्रीयतेमुळे आजारी पडून निधन झाले. देशातील आणि विशेषत: मुंबईतील अनेक दिग्ग्जांना धक्का बसण्यासारखी ही घटना होती. त्यावेळी गोखलेंचे कट्टर वैचारीक विरोधक असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणाले, आज भारतमातेचे हे रत्न झोपले, देशवासीयांनी त्यांचे जीवनात अनुकरण केले पाहिजे.

त्याचवेळी गोखलेंच्या निधनानंतर आपल्या गुरूची आठवण काढताना महात्मा गांधी म्हणाले, गोखले हे एक प्रेमळ व्यक्तीमत्व होते. सिंहासारखे धाडसी होते आणि मेनासारख मऊ ह्रदयाचे होते. तसेच राजकीय वर्तुळात टिकून राहिलेले एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे गोपाळकृष्ण गोखले होय. 

असा पहिला भारतीय नेता…

गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला. सरकारी विधेयकाचा निषेध म्हणून विधानपरिषदेच्या बाहेर जाणारे राजकारणातले सर्वात पहिले नेते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले होय. असा नेता, ज्यांचा साधेपणा आणि भाषणातली मुद्देसूद अचूकता वाचण्यासाठी सर्वसामान्य लोकही वर्तमानपत्राची वाट पाहत असत. एक असा नेता ज्याला गांधी आणि जीना दोघेही राजकीय गुरू मानत असत.

सुरुवातीला त्यांना रानडे व नौरोजी यांचे मार्गदर्शन मिळाले. यामुळे  ब्रिटीश संस्था आणि कायदे यांचे बारकाईने आकलन करण्याची त्यांना संधी मिळाली. तोपर्यंत मुंबईत विधान परिषदेची स्थापना केली गेली होती. जेथे बजेट व इतर बिलांवर वाद-विवाद होत असतं.या ठिकाणी ब्रिटनहून कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आलेले फिरोजशहा मेहता यांचा आवाज असे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, जेव्हा मेहतांची तब्येत ढासळली, तेव्हा त्यांनी गोखलेंची परिषदेत एंट्री केली आणि मग ही वॉकआउटची घटना घडली. हे शेतकर्‍यांकडून जमीन हक्क हिसकावण्याच्या प्रस्तावित विधेयकादरम्यान घडले. मेहता यांनी हे विधेयक रद्दबातल केले आणि सांगितले की ब्रिटीश सरकार असा बाप बनत आहे, जे दारिद्र्यात मुलांना जिवंत ठेवण्यासाठी आईला सांगतात आणि स्वत: मात्र आनंदी जगतात. 

मेहता पुढे बोलले, भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात काय आहे? काही नवीन मातीची भांडी. फुलांचे काही वन्य प्रकार. पोटभर अन्न. पान सुपारी आणि कधीकधी चमकदार चांदीचे दागिने. हे फक्त काही आनंद आहेत सामान्य माणूसाच्या आयुष्यातले. या लोकांचे आयुष्य पहाटेपासून संध्याकाळपर्यंत थकवणारे असते. ते केवळ सणानिमित्त आनंदी होत असतात. 

यानंतर बहुमताच्या बळावर हे विधेयक मंजूर करण्यावर सरकार ठाम होते. त्यानंतर मेहता, गोखले व इतर सदस्य सदनातून बाहेर पडले. हे अभूतपूर्व होते. ब्रिटीश परंपरेच्या रक्षकांना मात्र ही बाब बोचत होती. त्यावेळी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राचे इंग्रजी संपादक लेखातून म्हणाले, या सदस्यांनी त्वरित राजीनामा द्यायला हवा. 

गांधीजींचे गुरु होते गोपाळकृष्ण गोखले-

गोखले प्रसिद्ध झाले काही काळातच कॉंग्रेसवरील त्यांची पकडही वाढली. 1905 मध्ये ते काँग्रेस अध्यक्ष झाले. परंतु काही दिवसातच 1906 मध्ये पक्षाचे विभाजन झाले. कारण होते टिळक आणि गोखलेंमधले वाद. टिळक हे ब्रिटीश साम्राज्याचा तीव्र निषेध करत. टिळकांच्या मते या संसदीय वादविवादातून काहीही मिळणार नाही.तर गोखलेंच्या मते भारतीयांनी प्रथम शिक्षित होणे आवश्यक आहे. तरच ते नागरिक म्हणून त्यांचा हक्क म्हणजेच स्वातंत्र्य मिळवू शकतील.

मात्र, जेव्हा काँग्रेसमध्ये फुट पडली तेव्हा सरकारची राजकीय स्थिती कमकुवत झाली. 1912 मध्ये बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांच्या निमंत्रणावरून ते आफ्रिका दौर्‍यावर गेले. मुंबईत या काळात त्यांनी प्रतिभावंत बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांना राजकीय पाठबळ दिले.

गोखले जिन्ना यांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रंचड प्रभावित होते. त्यांचे मत होते की, जिन्ना हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.जेव्हा गांधी भारतात परत आले तेव्हा त्यांनी प्रथम गोखलेंची भेट घेतली. गोखले त्यांचे राजकीय गुरू होते. ते गांधीजींना म्हणाले, जर आपल्याला देश समजून घ्यायचा असेल तर त्याच्या जवळ जाणे गरजेचे आहे. संपूर्ण देश पहा समजून घ्या आणि मगच तुमची राजकीय धोरण बनवा. गांधींनी मृत्यूपर्यंत ही गोष्ट व्यवहारात ठेवली. गांधीजी पुढे सर्वसामान्य लोकांच्या घरी, खेड्यात, शेतात राहून देशवासीयांना भेटत राहिले.

निधनानंतर टिळकांनी विरोध करणे थांबवले- 

गोखले गरीब कुटुंबात असले तरीही त्यांच्या आई वडिलांना शिक्षणाचे महत्व माहिती होते. ते स्वतःला अडचणींचा सामना करत पण त्यांनी मुलाला उत्तम शिक्षण दिले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर गोखले गणिताचे प्राध्यापक झाले. कॉँग्रेसच्या स्थापनेनंतर अवघ्या चार वर्षानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना प्रेरणा मिळाली ती त्यांचे गुरु महादेव रानडे यांच्याकडून. महाविद्यालयात गोखलेंचे मित्र बाळ गंगाधर टिळक होते, जे नंतर त्यांचे सर्वात प्रसिद्ध राजकीय प्रतिस्पर्धी बनले. परिस्थिती अशी होती की गोखलेंमुळे टिळकांना 1906 मध्ये कॉंग्रेस सोडावी लागली आणि अशा प्रकारे देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष पहिल्यांदा विभाजित झाला. 10 वर्षांनंतर गोखलेंचे निधन झाले आणि टिळकांनी गोखलेंचा विरोध सोडून त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर पक्ष एक झाला.