आफ्रिकेत आढळला जगातला तिसरा सर्वात मोठा हिरा..

आफ्रिकेत जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. डायमंड कंपनीने देशाचे राष्ट्रपती Mokgweetsi Masisi यांना हा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा भेट म्हणून दिला आहे.

आफ्रिकेच्या बोत्सवानमधील खाणीमध्ये जगातील तिसरा मोठा हिरा सापडला आहे. तो 1,098 कॅरेटचा आहे. देबस्वाना डायमंड कंपनीने हा हिरा भेट म्हणून राष्ट्रपती Mokgweetsi Masisi यांना भेट म्हणून दिला आहे. गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात प्रथमच या हिरा कंपनीला इतका मोठा हिरा सापडला आहे. हा हिरा जगभरात चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे याआधी जगातील दोन्ही सर्वात मोठे हिरे आफ्रिकेतच सापडले आहेत.

3,106 कॅरेट वजनांचा जगातील सर्वात मोठा हिरा-

आफ्रिकेत आढळला जगातला तिसरा सर्वात मोठा हिरा

1905 मध्ये आफ्रिकेत 3,106 कॅरेटचा जगातील सर्वात मोठा हिरा सापडला होता. त्याला क्यूलियन स्टोन असे नाव देण्यात आले. 1109 कॅरेटचा दुसरा सर्वात मोठा हिरा लेसेडी-ला-रोना नावाचा 2015 मध्ये बोत्सवानमध्ये सापडला.

हिऱ्याला अद्याप नाव दिलेले नाही- 

देबस्वाना डायमंड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लिनेट आर्मस्ट्राँग म्हणाले, “प्राथमिक तपासणीत हा जगातील सर्वात मोठा तिसरा हिरा असल्याचे समोर आले आहे. खाणमंत्री लेफोको मोएगी म्हणतात की, या हिऱ्याला अद्याप नाव दिलेले नाही. लवकरच त्याचे नाव ठेवण्यात येईल.

डायमंड 72 मिमी लांब आणि 52 मिमी रुंद-

लेफोको यांच्या मते, हीरा 72 मिमी लांब आणि 52 मिमी रूंदीचा आहे. तो 27 मिमी जाड आहे. कोरोना कालावधीत 2020 पासून आतापर्यंत हिराचा व्यवसाय मंदीतून जात आहे. अशा परिस्थितीत, हिरा मिळणे ही चांगली वेळ येण्यासारखे असते.

देबस्वाना डायमंड कंपनीला हिऱ्याच्या उत्पन्नापैकी 80 टक्के रक्कम सरकारला द्यावी लागते. 2020 मध्ये कंपनीचे उत्पादन 29 टक्क्यांनी घटले होते. यावेळी विक्रीत 30 टक्के घट झाली आहे.