फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ म्हणजेच फील्ड मार्शल माणेकशाॅ यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारताचे नेतृत्व केले होते. ज्या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला आणि त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली.
भारदस्त मिश्या असणाऱ्या भारताच्या पहिल्या फिल्ड मार्शल एसएचएफजे माणेकशाॅ यांच्याविषयी तुम्ही ऐकले असेल . प्रत्येक प्रश्नांची हजरजबाबीपणे उत्तरे देणाऱ्या माणेकशाॅ यांच्या नसानसात लष्करी गुण होते. त्यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात त्यांच्याइतका नीटनेटका आणि हुशार माणूस केवळ तेच होते. अशा या माणेकशाॅ यांच्या विषयीचे काही मजेदार किस्से आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
त्याचबरोबर त्यांनी लोकांना हजरजबाबीपणे दिलेली उत्तरेही वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. ते म्हणायचे की, जर एखादा सैनिक म्हणतो की त्याला मृत्यूची भीती वाटत नाही तर तो खोटे बोलत आहे किंवा तो गुरखा आहे.
1971 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होणार होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी जनरल माणेकशाॅ यांना विचारले की युद्धाची तयारी पूर्ण झाली आहे का? यावर माणेकशाॅ शांतपणे म्हणाले- “ आय एम ऑलव्हेज रेडी स्वीटी.” इंदिरा गांधींना स्वीटी म्हणण्याची क्षमता केवळ माणेकशाॅ यांच्या मध्येच होती.
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मनात आले होते की माणेकशाॅ सैन्याच्या मदतीने उठाव करण्याचा प्रयत्न करू शकतात. यावर माणेकशाॅ थेट इंदिरा गांधींकडे गेले आणि म्हणाले, “तुम्हाला असे वाटत नाही का, मी तुमच्या खुर्चीसाठी पात्र आहे मॅडम? कारण, आपल्याकडे लांब नाक आहे. माझ्याकडेही लांब नाक आहे, परंतु मी इतरांच्या गोष्टीत नाक खुपसत नाही.”
रणांगणावर सात गोळ्या लागल्या नंतर जनरल माणेकशाॅ यांना सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना विचारले काय झाले? माणेकशाॅ म्हणाले, अरे काही नाही, गाढवाने लाथ मारली. त्यांच्या हजरजबाबीपणावर ‘अ लाइफ लिव सच’ नावाचा माहितीपट तयार करण्यात आला आहे. फील्ड मार्शल माणेकशाॅ यांचा हजरजबाबीपणा आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व याविषयी लेखी पुरावे आहेत. या माहितीपटात त्यांच्या कुटुंबीयांबद्दल, तसेच लष्करी सेवेबद्दलही सांगण्यात आले आहे.
1962 मध्ये जेव्हा मिझोरमच्या एका बटालियनने भारत-चीन युद्धापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा माणेकशाॅ यांनी पार्सलमध्ये बांगड्यांच्या बॉक्ससह त्या बटालियनला एक चिठ्ठी पाठविली. ज्यावर असे लिहिले होते की जर तुम्ही लढाई मधून माघार घेत असाल तर आपल्या माणसांना पाठविलेल्या बांगड्या घालण्यास सांगा. त्यानंतर या बटालियनने लढाईत भाग घेतला आणि खूप चांगले काम केले. आता माणेकशाॅ यांनी पुन्हा एक चिठ्ठी पाठविली ज्यामध्ये बांगड्यांचा बॉक्स परत पाठवा असे सांगितले होते.
1971 च्या युद्धानंतर त्यांना विचारण्यात आले होते की फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानमध्ये गेला असता तर काय झाले असते. यावर माणेकशाॅ हसले आणि म्हणाले, काय झाले असते पाकिस्तानने 71 ची लढाई जिंकली असती. तसेच आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की फील्ड मार्शल माणेकशाॅ हे 1934 ते 2008 पर्यंत भारतीय सैन्यात सेवेत होते. ज्यामध्ये त्यांनी दुसरे महायुद्ध, 1962 चे दुसरे भारत-चीन युद्ध, 1965 चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भाग घेतला होता. भारत-चीन युद्ध आणि त्यानंतरची सर्व युद्धे माणेकशाॅ यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली.