डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांची जयंती 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून साजरी केली जाते. स्वतंत्र भारत घडविण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. भारतरत्न डॉ भीमराव आंबेडकर यांच्याशी संबंधित अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना माहिती नाहीत. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून बाबासाहेबांबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती..
- भारतरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. भीमराव आंबेडकर जागतिक स्तरावरील न्यायशास्त्रज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि कोट्यावधी पीडित, दलित, मागासवर्गीय, महिलांना त्यांचे अधिकार आणि आदिवासींना सन्माननीय जीवन देणारे म्हणून कायम स्मरणात राहतील. भीमराव आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदेत भाग घेणारे एकमेव बिगर-कॉंग्रेस नेते होते.
- डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू (मध्य प्रदेश) येथील अस्पृश्य कुटुंबात झाला. कोलंबिया विद्यापीठाने एका सर्वेक्षणात डॉ. आंबेडकर यांना जगातील पहिल्या क्रमांकाचे अभ्यासक म्हणून घोषित केले आहे. मानवमुक्ती चळवळीचे श्रेय ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे चौदावे व शेवटचे अपत्य होते.
- आंबेडकर यांचे मूळ आडनाव अंबावडेकर होते. परंतु त्यांचे शिक्षक, महादेव आंबेडकर, ज्यांचा ते खूप आदर करत होते, त्यांनी शालेय नोंदीत त्यांचे नाव अंबावडेकर वरून आंबेडकर असे ठेवले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट (पीएचडी) पदवी मिळविण्यासाठी परदेशात गेलेले पहिले भारतीय होते.
- डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा पुतळा कार्ल मार्क्स यांच्या पुतळ्या सोबत लंडनच्या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.
- भारतीय तिरंगामध्ये “अशोक चक्र” ला स्थान देण्याचे श्रेय डॉ आंबेडकर यांना जाते.
- नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ प्रो. अमर्त्य सेन, डॉ आंबेडकर यांना अर्थशास्त्रात स्वतःचे गुरू मानतात.
- मध्य प्रदेश आणि बिहारच्या विकासासाठी बाबासाहेबांनी 50 च्या दशकातच विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु 2000 मध्ये हा प्रस्ताव सत्यात उतरला आणि छत्तीसगड व झारखंडची निर्मिती झाली.
- बाबासाहेबांच्या वैयक्तिक ग्रंथालय “राजगृह” मध्ये 50,000 पेक्षा जास्त पुस्तके होती आणि ही जगातील सर्वात मोठी खासगी लायब्ररी होती.
- बाबासाहेबांनी लिहिलेले “वेटिंग फॉर व्हिसा” हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठातील पाठ्यपुस्तक आहे. कोलंबिया विद्यापीठाने 2004 मध्ये जगातील पहिल्या 100 अभ्यासकांची यादी तयार केली आणि त्यातील पहिले नाव डॉ. भीमराव आंबेडकर होते.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकूण 64 विषयात मास्टर होते. हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजराती अशा भाषांमध्ये पारंगत होते. याशिवाय त्यांनी सुमारे 21 वर्षे जगातील सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला.
- बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण पूर्ण केले. जे शिक्षण 8 वर्षांमध्ये पूर्ण होणार होते ते केवळ 2 वर्ष 3 महिन्यांत त्यांनी संपले. यासाठी त्यांनी दिवसा 21-21 तास अभ्यास केला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा त्यांच्या 8,50000 अनुयायांसह घेतली. ही जगातील ऐतिहासिक घटना होती. कारण हे जगातील सर्वात मोठे धर्मांतर होते.
- बाबासाहेबांना बौद्ध धर्माची दीक्षा देणारे थोर बौद्ध भिक्षु “महंत वीर चंद्रमणी” यांनी त्यांना “या काळातील आधुनिक बुद्ध” म्हटले.
- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स कडून “डॉक्टर ऑल सायन्स” ही डॉक्टरेटची अमूल्य पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब जगातील पहिले आणि एकमेव महान व्यक्ती आहेत. अनेक हुशार विद्यार्थ्यांनी यासाठी प्रयत्न केले पण त्यांना आतापर्यंत यश मिळू शकले नाही.
- जगातील सर्वात जास्त गाणी आणि पुस्तके ज्यांच्या जीवनावर लिहिली गेलेला नेता म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर.
- राज्यपाल लॉर्ड लिनलिथगो आणि महात्मा गांधी यांना असे वाटत असे की बाबासाहेब 500 पदवीधर आणि हजारो विद्वानांपेक्षा बुद्धिमान आहेत.
- पाणी पिण्यासाठी सत्याग्रह करणारे बाबासाहेब जगातील पहिले आणि एकमेव सत्याग्रही होते.
- 1954 मध्ये बौद्ध भिक्षूंनी नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या “जागतिक बौद्ध परिषदे”मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची सर्वोच्च पदवी “बोधिसत्व” प्रदान केली. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक “द बुद्ध अँड हिज धम्म” हे भारतीय बौद्धांचा “धर्मग्रंथ” आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले या तीन महापुरुषांना आपला गुरु मानत.
- जगभरात सर्वाधिक पुतळे बाबासाहेबांचे आहेत. त्यांची जयंती देखील जगभरात साजरी केली जाते.
- ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या “द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स” नावाच्या सर्वेक्षणानुसार गेल्या 10 हजार वर्षांच्या जगातील सर्वात बुद्धिमान 100 व्यक्तींच्या यादीत बाबासाहेबांचे नाव चौथ्या क्रमांकावर होते.
- भगवान गौतम बुद्धांचे बंद डोळे असलेल्या अनेक प्रतिमा, पुतळे आपल्याला जगभरात पाहायला मिळतात. परंतु एक उत्तम चित्रकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचे उघडे डोळे असलेले चित्र काढले होते.
- बाबासाहेबांचा पहिला पुतळा 1950 मध्ये ते जिवंत असताना बनवला गेला होता. सध्या हा पुतळा कोल्हापूर शहरात आहे.