भगत सिंगचा जन्म सप्टेंबर १९०७ साली पंजाबमध्ये झाला आणि सँडर्सच्या हत्येचा दोषी आढळल्यानंतर २ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती. ५, ६ ऑक्टोबर रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात असताना एका धार्मिक माणसाला उत्तर देण्यासाठी त्याने एक निबंध लिहिला, ज्याने त्याच्यावर नास्तिक असल्याचा ठपका लागला, त्यावेळी त्याचे वय २३ वर्षांचे होते.
भगत सिंग ‘शहीद-ए-आजम’ म्हणूनही ओळखला जायचा. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षीच तो क्रांतिकारी झाला. १३ एप्रिल, १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडाने त्यांच्या मनावर खोलवर चाप उमटविली होती, यामुळे तो वीर स्वातंत्र्यसेनानी झाला आणि महाविद्यालय सोडले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी नौजवान भारत सभाची स्थापना केली. त्यांनी ज्या प्रकारे ब्रिटीश सरकारशी लढा दिला तो कधीच विसरता येणार नाही.
५, ६ ऑक्टोबर रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात असताना एका धार्मिक माणसाला उत्तर देण्यासाठी त्याने एक निबंध लिहिला ज्याने त्याच्यावर नास्तिक असल्याचा ठपका लागला. हा निबंध १९३४ मध्ये प्रकाशित झाला आणि त्याला तरुणांनी मोठा पाठिंबा दिला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हा निबंध खूपच आवडले आणि त्याच्या बर्याच प्रतीही विकल्या.
भगत सिंग ने लिहिले होते की मी सर्वशक्तिमान देवावर विश्वास ठेवण्यास नकार देतो,मी नास्तिक आहे ह्याचा अर्थ असा होत नाही कि मी गर्विष्ठ आहे, ढोंगी आहे किंवा निरर्थक आहे आणि मी कोणाचाही अवतार नाही, देवाचा दूत किंवा दैवी आत्मही नाही. मी एक सामानय मनुष्य आहे आणि मी एका कारणासाठी माझे जीवन देणार आहे म्हणजेच देशासाठी आणि यापेक्षा मोठे कार्य काहीच असू शकत नाही, जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो तो माझ्यासारखं करून पुनर्जन्मात राजा होण्याची आशा करू शकतो. एखादा मुस्लिम किंवा ख्रिश्चन असं करून स्वर्गात आनंद घेण्याची अशा ठेवू शकतो परंतु मी काय अपेक्षा करावी? मला माहित आहे की ज्या क्षणी दोरीचा नळ मला घट्ट मिठी मारेल आणि माझ्या पायाखालचा तख्ता खेचला जाईल, ही माझी शेवटची वेळ असेल, परंतु कोणत्याही स्वार्थ न बाळगता, येथे किंवा यानंतर, कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता, मी निस्वार्थपणे माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या नावी केले आहे..
भगत सिंगने असे हि म्हण्टले आहे की लाहोर प्रकरणात जेव्हा पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्याचा विश्वास देवावरून उडाला नव्हता कारण बालपणात तो प्रार्थना करायचा, वडिलांनी त्याला वाढवले होते आणि ते आर्य समाजवादि होते आणि ह्यामुळे त्यांनी स्वत: ला देशासाठी समर्पित केले, महाविद्यालयीन काळापासून तो देवाबद्दल विचार करीत असत आणि मग तो क्रांतिकारक पक्षात सामील झाला आणि तिथेच त्याला काकोरी कटात तुरुंगात टाकलेल्या सचिंद्र नाथ सान्यालबद्दल माहिती मिळाली. तेथून भगतसिंगांच्या जीवनाला नवीन वळण मिळाले आणि हे समजले की कोणत्याही क्रांतिकारक नेत्याने आपल्या विचारांनी लोकांवर प्रभाव पाडला पाहिजे. परंतु जेव्हा भगत सिंगच्या मित्रांना फाशी देण्यात आली आणि तेव्हा क्रांतिकारक पक्षाची सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडली, तेव्हा त्याला समजले की ‘धर्म हा मानवी दुर्बलता किंवा मानवी ज्ञानाच्या सीमा आहे ‘ कारण फाशी झालेल्या चारही सहकारी धर्मासमवेत देशभक्तीचा प्रचार करत होते..
भगत सिंग लिहतो की आपल्या पूर्वजांनी सुद्धा सर्वशक्तिमान देवावर विश्वास ठेवला असावा आणि ज्याने या विश्वासाच्या सत्यतेला किंवा त्या ईश्वराच्या अस्तित्वाला आव्हान दिले, त्याला काफिर किंवा पाखंडी बोलले गेले , जरी त्या व्यक्तीचे तर्क इतके प्रबळ असावा की त्याला नाकारणे अशक्य असावे. मी घमंडामुळे नास्तिक बनलो नाही, परंतु देवावरील माझ्या अविश्वासामुळे आज सर्व परिस्थिती अश्या प्रतिकूल झाल्या आहेत आणि ही परिस्थिती आणखीनच बिकट होऊ शकते आणि या परिस्थितीला थोडेसे अध्यात्म वेगळे वळण देऊ शकते, परंतु माझा शेवट पूर्ण करण्यासाठी मी कोणताही युक्तिवाद करू इच्छित नाही.
ते पुढे लिहितात की मी एक वास्तववादी व्यक्ती आहे आणि मला प्रयत्न करून देखील यश मिळत नसले तरी तर्कसंगत राहून मला माझ्यावर विजय मिळवायचा आहे, परंतु प्रयत्न करणे हे मानवाचे कर्तव्य आहे, जय आणि पराजय हे परिस्थितीवर अवलंबून असते. पुढे जात असलेल्या प्रत्येक व्यक्ती ने जुन्या रुडीच्या सगळ्या सिद्धांतामध्ये दोष शोधला पाहिजे आणि एक एक करून सगळ्या मान्यतांवर प्रश्न उपस्तिथ केला पाहिजे, आणि प्रत्येक बारीक गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि कठोर वादविवादानंतर जर तो एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचला असेल तर त्याला त्याच्या कार्यासाठी कौतुक केले पाहिजे. तरीही त्या व्यक्तीचा युक्तिवाद देखील खोटे मानले जाऊ शकतात, पण त्याचे तर्क खरे देखील समजूजाऊ शकतात कारण तर्क हेच जीवनाचा मार्गदर्शक आहे . उलट मी म्हणायला पाहिजे की विश्वास असणे चुकीचे नाही परंतु अंधश्रद्धा अतिशय घातक आहे, तो एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती नष्ट करतो आणि त्याला सुधार-विरोधी बनवितो.
देवामुळे ब्रिटिश आपल्यावर राज करत नाही पण ते त्यांच्या ताखतीमुळे राज्य करतात आणि त्यांचा विरोध करण्याचे आपल्यात धैर्य नाही. ब्रिटीश भगवंताच्या मदतीने आम्हाला नियंत्रणात ठेवत नाहीत, परंतु ते त्यांच्या बंदुकीमुळे आणि सैन्याच्या मदतीने हे करत आहेत. मला माझा एक मित्र प्रार्थना करायला सांगायचा, जेव्हा मी जेव्हा त्याला मी नास्तिक आहे असा सांगायचो तेव्हा तो म्हणायचा की शेवटच्या दिवशी जेव्हा तू मृत्यू जवळ जाशील तेव्हा तू विश्वास ठेवायला सुरूवात करशील. मग मी म्हणालो, माझ्या प्रिय मित्रा, असे कधी होणार नाही. मी हे माझ्या निकृष्ट आणि नैतिक अधोगतीचे कारण मानले आहे, अश्या स्वार्थी कारणासाठी मी कधीही प्रार्थना करणार नाही
भगत सिंग असे विचार होते कि स्वार्थी होऊन आपण भगवंताला प्रार्थना करू नये, तर ब्रिटीशांसाठी स्वतःला एवढे भक्कम केले पाहिजे की आपण त्या लोकांचा सामना करू शकू.