कोरोना विषाणू ने भारतामध्ये थैमान घातले आहे आणि प्रत्येक राज्यात आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे व ऑक्सिजनचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे, यामुळे खूप लोकांना आपले प्राण गमवावा लागले आहेत.
ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना काय करावे, याबद्दल लोकांना माहिती असणे आवश्यक आहे. त्वरित वैद्यकीय मदत घेणे किंवा ऑक्सिजनचा पुरवठा करणे हाच एक पर्याय नाही असू शकत कारण अनेक रुग्णांमुळे सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून ह्या लेखा मध्ये काय करावे हे समजावण्यात आले आहे.
प्रोनिंग
प्रोनिंग म्हणजे रुग्णाला त्याच्या पोटावर किंवा चेहरा खाली ठेवून झोपायची प्रक्रिया. ह्या पोसिशन मुळे रुग्णाला स्वास घेण्यास व ऑक्सिजनिकरण सुधारण्यासाठी मदत मिळते, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे, कारण ह्या पोसिशनमुळे अल्व्होलर युनिट उघडे राहण्यास मदत होते. जेव्हा रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि SpO2 पातळी ९४ च्या खाली असेल तेव्हा हा उपाय अवलंबला जाऊ शकतो.
प्रोनिंगचा सराव करताना लक्षात ठेवण्यानाऱ्या गोष्टी..
जेवणानंतर किमान एक तासासाठी प्रोनिंग करण्यास टाळणे. प्रोनिंग करताना, आपल्या शरीरात अस्वस्थता जाणवत असेल तर त्वरित प्रक्रिया थांबवावी.
एक रुग्ण एकाधिक चक्रात दिवसात 10 तासांपर्यंत प्रोनिंग करू शकतो परंतु कोणत्याही त्रासाचा मागोवा ठेवणे महत्वाचे असते, विशेषत: हाडांच्या भागाच्या आसपास. हे फक्त आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर किंवा रुग्णालयाचा पलंग उपलब्ध नसेल आणि आपण वाट पाहत असाल तरच केले पाहिजे.
होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रूग्णांसाठी आणि रूग्णालयात किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णांसाठीदेखील लाभदायक आहे
रक्तामध्ये ऑक्सिजनची पातळीः लो आणि नॉर्मल कशी ओळखावी?
SpO2 पातळी ९४ ते १०० दरम्यान निरोगी मानली जाते. “जर ९० च्या खाली असेल तर ते धोकादायक असू शकते आणि त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत घेण्याची गरज आहे. कोविड रूग्णांची कटऑफ ९४ टक्के आहे, ”असे डॉक्टर म्हणतात.
ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे हायपोक्सिमिया होऊ शकतो. हि अशी स्थिती आहे जेव्हा आपल्या शरीरात ऑक्सिजनची पातळी सातत्याने कमी होते आणि योग्यरीत्या आणि वेळेवर उपचार न घेतल्यास अवयव नुकसान किंवा प्रभावित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
कोविड १९ मुळे रुग्णांवर घातक परिणाम झाला आहे, शरीरातील ऑक्सिजन पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. व्हायरसने फुफ्फुस आणि छातीच्या पोकळीचे नुकसान होतात, हेच कारण आहे जे कोविड ला घातक बनवतात.
जवळून देखरेखीचे महत्त्व..
रुग्णाच्या ऑक्सिजनच्या पातळीचे परीक्षण करणे महत्त्वपूर्ण आहे. “घरी ऑक्सिजन थेरपीसारख्या किंवा प्रोनिंग पद्धती उपयुक्त ठरू शकतात परंतु सतत देखरेखीची आवश्यकता असते. ऑक्सिजनची पातळी खालावल्यास किंवा खालच्या पातळीवर स्थिर राहिल्यास लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे”.