२८ एप्रिल पासून देशभरातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी लसीकरण नोंदणी सुरू झाली आहे. १ मे पासून लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे. म्हणून, लसीकरण करण्या आधी दोघांबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
१ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांकरिता लसीकरण सुरू होणार आहे. खासगी रित्या लस विकायची परवानगी सुद्धा सरकारने जाहीर केली आहे. लसीकरणासाठी को-विन अॅपद्वारे २८ एप्रिलपासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. सध्या कोविशील्ड(Covishield) आणि कोवाक्सिन(Covaxin) या दोनच लस उपलब्ध आहेत. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांना खाजगी केंद्रे किंवा सरकारी केंद्रांवर लसी देण्यात येणार आहेत. काही राज्यांनी लसीकरण विनामूल्य जाहीर केले आहे त्यात महाराष्ट्राचा हि समावेश आहे. कोणती लस घ्यायची हे ठरविण्यापूर्वी आपल्याला कोविशील्ड आणि कोवाक्सिन बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
कोविशील्ड-(Covishield)
ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. अॅडेनोव्हायरस निष्क्रिय करून ही लस विकसित केली गेली आहे. चिंपांजी मध्ये सर्दी निर्माण करणारी निष्क्रिय एडिनोवायरसच्या वरती SARS-CoV-२ ची स्पाइन प्रोटीन चा जेनेटिक मेटेरियल लागू करून तयार केली गेली आहे. लसीमध्ये वापरल्या जाणार्या अॅडेनोव्हायरस ह्या विषाणूमुळे चिंपांझीला सर्दी होते, अॅडेनोव्हायरस निष्क्रिय करून लस तयार गेली आहे.
हे काम कसे करते ते जाणून घेऊया..
जेव्हा एखाद्या रुग्णाला लसचा एक डोस दिला जातो तेव्हा शरीरामधील प्रतिरक्षा प्रणालीला अँटीबॉडीज तयार करण्यास आणि कोणत्याही कोरोना वायरस संसर्गावर हल्ला करण्यास तयार करते.
कार्यक्षमता
कोविशील्डची एकूण कार्यक्षमता ७० टक्के आहे. तथापि, एका महिन्यानंतर संपूर्ण डोस दिल्यास ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते.
साठवण
हि लस २-८ डिग्री सेल्सियस तपमानावर सुरक्षित ठेवली जाऊ शकते.
कोवाक्सिन– (Covaxin)
हि एक निष्क्रिय लस आहे, याचा अर्थ हि मृत कोरोना विषाणूपासून बनली आह, जे कि शक्तिहीन आहे आणि त्याचा कोणता हि विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही. हि लस भारत बायोटेक आणि आयसीएमआर या भारतीय कंपनीने विकसित केली आहे. यातील इम्युन सेल्स कोरोना वायरसच्या विरोधात एंटीबॉडी निर्माण करण्यासाठी आपल्या इम्युन सिस्टमला विकसित करतो.
हे काम कसे करते ते जाणून घेऊया..
न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, डिलीवरीच्या वेळी ही लस SARS-CoV-2 कोरोना विषाणूविरूद्ध एंटीबॉडी तयार करण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणा तयार करते. एंटीबॉडी व्हायरल प्रोटीनशी संबंधित आहे, जसे की स्पाइक प्रोटीन जे त्याच्या पृष्ठभागला स्टड करते.
कार्यक्षमता
कोवाक्सिनच्या दुसऱ्या अंतरिम एनालिसिस मध्ये ७८ टक्के प्रभावीपणा आणि गंभीर कोविड -१९ आजराविरुद्ध १०० टक्के प्रभावीपणा दाखवला गेला आहे.
साठवण
हि लस २-८ डिग्री सेल्सियस तपमानावर सुरक्षित ठेवली जाऊ शकते.
ह्या दोन्ही लस लाभदायक आहे, व तुम्ही ह्यातील कोणती हि लस घेऊ शकता आणि आपल्या देशाला कोरोना संकटतातून बाहेर काडू शकता.