तुम्हाला दृष्टी दोष आहे मग ह्या ५ भाज्या नक्की खा..

आजकाल बदललेल्या राहणीमानामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. पूर्वी वयोमानानुसार रुग्णांमध्ये दृष्टी दोष आढळत असतं. पण अलीकडे तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वापरामुळे तसेच खाद्यपदार्थांमध्ये पौष्टिक आहाराची कमतरता असल्यामुळे लहान वयात मुलांची दृष्टी कमजोर होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे आज आपण डोळ्याच्या आरोग्याची काळजी आहाराच्या माध्यमातून कशी घ्यायची हे जाणून घेणार आहोत. 


डोळ्याच्या आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खूप फायदेशीर असतात. भाज्या खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढवतेच परंतु डोळ्यांची दृष्टी देखील चांगली राहते. ज्यांना दिसण्याची समस्या आहे त्यांनी अशा परिस्थितीत आपल्या आहारात बदल करुन डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. दृष्टीची समस्या असणाऱ्यांनी आपल्या आहारात या 5 भाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत.

पालक

हिरव्या पालेभाज्या डोळ्यांसाठी सर्वात फायदेशीर असतात. तुम्ही या भाज्या रोज खाल्ल्या पाहिजेत. पालकमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे  वेगवेगळे आजार होण्याचा धोका कमी होतो. पालकमध्ये अ आणि क जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते.

गाजर

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी गाजर हे एक चांगला स्त्रोत आहे. गाजरामध्ये भरपूर व्हिटॅमिन ए असते. तसेच बीटा कॅरोटीन देखील असते, जे असे अँटीऑक्सिडेंट आहे ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. हिवाळ्यात आपण दररोज गाजराचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

ब्रोकोली

ब्रोकोली डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ब्रोकोली हा क्रूसीफेरस भाजीपाला प्रकारचा एक भाग आहे. ज्यामध्ये सल्फोराफेन असते, त्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फोलेट, मॅंगनीज आणि पोटॅशियम असतात.

रताळे

रताळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात तुम्ही रताळे खायलाच पाहिजे. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असते. रताळे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आपण रताळे कच्चे किंवा उकडलेले खाऊ शकता

टोमॅटो

टोमॅटो डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॉपर देखील असतात, जे डोळे निरोगी ठेवतात.