राजेश खन्ना उर्फ काका हे 20 व्या शतकातील सुपस्टार तर इरफान खान हे 21व्या शतकातले सुपरस्टार. बॉलीवूड अभिनेते राजेश खन्ना आणि इरफान खान आज भले ही या जगात नसले तरीही त्यांच्या अभिनयामुळे ते आजही अजरामर आहेत. राजेश खन्ना आणि इरफान खान हे दोघेही बॉलीवूड मधले एक प्रसिद्ध कलाकार आहेत अभिनयाच्या बाबतीत त्यांचा कोणीही हात पकडू शकत नाही. राजेश खन्ना आणि इरफान खान यांनी आपापल्या काळात चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला. त्यामुळे आजही त्यांच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होते. अशा या सर्वगुणसंपन्न दोन कलाकारांविषयी असलेला एक वेगळाच किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असेल की इरफान खान हे राजेश खन्ना यांचे खूप मोठे चाहते होते. इतकेच नाही तर अभिनेता होण्याआधी इरफान खान राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर त्यांना भेटण्यासाठी एसी रिपेरिंग करण्याच्या बहाण्याने गेले होते.
इरफान खान यांनी एका मुलाखती दरम्यान स्वतः हा किस्सा सांगितला. त्यावेळी ते म्हणाले, अभिनेता होण्यापूर्वी मुंबईमध्ये मी इलेक्ट्रिशनचे काम करत होतो. त्यामुळे मुंबईत राहण्यासाठी आणि आपली रोजीरोटी चालवण्यासाठी मी एसी रिपेरिंग चे काम करत असे. एक दिवस योगायोगाने मेकॅनिक असल्यामुळे राजेश खन्ना यांच्या घरचा एसी रिपेअर करण्यासाठी जाण्याचा योग आला.
“माझ्या चांगलंच लक्षात आहे ज्या दिवशी मी राजेश खन्ना साहेबांच्या बंगल्यावर पोचलो, तेव्हा त्यांचा दरवाजा त्यांच्या नोकराणीने उघडला. मी त्यांचं घर पाहत होतो. ही पहिलीच वेळ होती जेव्हा मी इतका सुंदर बंगला पाहिला होता. त्यामुळे मी माझ्या डोळ्यांनी राजेश खन्ना साहेबांचे घर बघतच राहिलो. त्याचबरोबर माझे डोळे कुठेतरी खन्ना साहेबांना सुद्धा शोधू लागले. परंतु, त्यादिवशी त्यांची भेट माझ्या नशीबातच नव्हती त्यामुळे त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. कारण ते त्या दिवशी घरी नव्हते”.
“कदाचित मी त्यादिवशी त्यांना भेटू शकलो असतो आणि माझ्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगू शकलो असतो. परंतु, तसे झाले नाही. ही गोष्ट माझ्या मनात पुढे काही वर्षे तशीच चालत राहिली त्यानंतर बऱ्याच दिवसांनी एकदा राजेश खन्ना साहेबांशी माझी मुलाखत झाली. परंतु, त्यांच्याबरोबर काम करण्याची मला कधीही संधी मिळाली नाही याचे दुःख माझ्या मनात कायमच राहिले.”
या मुलाखतीत इरफान खान यांनी राजेश खन्ना यांच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी ते असे म्हणाले होते की, राजेश खन्ना साहेबांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडमध्ये जे स्थान प्राप्त केले ते परत कोणत्याही अभिनेत्याला करता आले नाही. ते बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री मधले पहिले असे अभिनेते होते जे सुपरस्टार ठरले आणि त्यांची जागा आजही सुपरस्टार म्हणूनच आहे.
आज हे दोन्ही कलाकार या जगात नसले तरीही ते त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या डायलॉगमुळे आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत.