मिश्या असलेल्या जगप्रसिद्ध राजकुमारीची कहाणी, असे म्हणतात की १३ तरुणांनी तिच्यासाठी जीव दिला होता..

आजकाल लोक दररोज तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतात, परंतु असे यापूर्वी नव्हते. लठ्ठपणा चांगला मानला जायचा. १९ शतकात, इराणची राजकुमारी ताज अल काझार सुलतानाच्या सौंदर्याच्या किस्से आजही बोलले जातात . तिच्या सौन्दर्याने सर्व मानक मोडले होते.राजकुमारीच्या चेहर्यावर भुवया आणि लांब मिशा होत्या. तसेच ती खूप लठ्ठ असायची, त्यावेळी हे सौंदर्य मानले जात होते. राजकुमारीच्या सौन्दर्यावर फिदा १३ तरुणांना नाकारल्या नंतर आत्महत्या केली होती. ती हिजाब न घालणारी व वेस्टर्न कपड़े घालणारी त्याकाळातील पहिली महिला होती.

राजकुमारीचे अनेक अफेयर होते..

  • राजकुमारी काजर पर्शियाचा राजा नासिर अल दिन शाह काजर याची मुलगी होती. शाह यांनी १८४८ ते मे १८६९ पर्यंत राज्य केले. राजकुमारी काजरला पर्शियातील सौंदर्याचे प्रतीक म्हणून घोषित केले गेले होते.
  • एका वेबसाइटच्या म्हणण्यानुसार, तेथे मोठ्या संख्येने असे तरुण होते जे राजकन्याचे दिवाने होते आणि तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक होते. राजकुमारीने नाकारलेल्या सुमारे १३ तरुणांनी आत्महत्या केली होती.
  • तिचे लग्न अमीर हुसेन खान शोजा ए सुल्तानेहशी झाले होते, त्यांना दोन मुले आणि दोन मुली होते. तथापि, नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
  • मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला गेला आहे कि तिचे खूप अफेयर होते. गुलाम अली खान अजीज अल सुलतान यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. तिचे दुसरे अफेयर इराणी कवी आरिफ काजविनी यांच्या सोबत होते असे सांगितले गेले आहे.

हिजाब न घालणारी पहिली महिला..

सौंदर्याबरोबरच तिला तिच्या काळातील आधुनिक स्त्री मानली जात होते . ती एक लेखक, चित्रकार आणि कार्यकर्त्या देखील होती. तिनेच महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची परंपरा सुरू केली. हिजाब काढणारी ती त्या काळातील पहिली महिला मानली जाते. ति वेस्टर्न कपडे परिधान करायची.

तीला आईपासून दूर ठेवले होते..

ऐतिहासिक वृत्तानुसार, शहा यांनी तिला एका वेगळ्या मार्गाने सांभाळ केला. शहा यांना पारंपरिक संगोपन पद्धतींबद्दल मोठा आक्षेप होता. हेच कारण आहे की त्याने काजरला तिच्या आईपासून वेगळे ठेवले. त्यांच्यासाठी नर्स ते ट्यूटरपर्यंतची तरतूद केली होती. दिवसातून एक किंवा दोन वेळा तिला तिच्या आईशी भेटण्याची परवानगी दिली जायची.