भारताची राजधानी नवी दिल्ली ऐतिहासिक राजधानी आहे. पण नवी दिल्लीला भारताची राजधानी म्हणून कधी घोषित करण्यात आले? नवी दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कोणती होती? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
नवी दिल्ली कधी आणि कशी भारताची राजधानी बनली?
13 फेब्रुवारी 1931 रोजी दिल्लीला अधिकृतपणे राजधानी म्हणून घोषित करण्यात आले.
भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीचा पाया तत्कालीन सम्राट जॉर्ज पाचवा यांच्या द्वारे रचण्यात आला. दिल्लीला भारताची राजधानी करण्याचा प्रस्ताव 1911 च्या दिल्ली दरबार कार्यक्रमात ठेवण्यात आला होता. शहराची वास्तुकला आणि नियोजन दोन ब्रिटिश आर्किटेक्ट सर हर्बर्ट बेकर (Sir Herbert Baker) आणि सर एडविन लुटियन (Sir Edwin Lutyens) यांच्याद्वारे बनविण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी 1931 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी दिल्लीचे देशाची राजधानी म्हणून उद्घाटन केले. तेव्हापासून नवी दिल्ली सरकारचे केंद्र बनली आणि देश चालविण्यासाठी आवश्यक सर्व शाखा (कायदे, न्यायव्यवस्था आणि कार्यकारी) दिल्लीमध्ये आहेत.
नवी दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कोणती होती?
भारताची राजधानी दिल्ली होण्यापूर्वी 1911 पर्यंत कोलकत्ता ही देशाची राजधानी होती. तसेच दिल्ली यापूर्वी भारतावर राज्य केलेल्या अनेक साम्राज्यांचे आर्थिक आणि राजकीय केंद्र होते. यापैकी काही उत्तम उदाहरणे म्हणजे दिल्ली सल्तनत मधील मुघलांच्या कारकीर्दीची 1649-1857. ब्रिटिश भारतात आल्यानंतर बर्याच गोष्टी बदलल्या. 1900 च्या सुरुवातीच्या काळात ब्रिटीश प्रशासनाने भारतीय साम्राज्याची राजधानी कलकत्ताहून दिल्लीला हलविण्याचा विचार केला.
कोलकत्ता वरून दिल्लीला भारताची राजधानी हलवण्यामागील कारण काय होते?
राजधानी हलवण्यामागील मुख्य कारण म्हणजे दिल्लीचे स्थान. कोलकत्ता हे देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागात होते, तर दिल्ली उत्तरेकडील भागात होती. ब्रिटीश सरकारच्या म्हणण्यानुसार, दिल्लीहून राज्य करणे सोपे आणि सोयीचे होते.
हा प्रस्ताव ब्रिटीश राजांनी मान्य केला आणि त्यानंतर 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबार दरम्यान तत्कालीन शासक जॉर्ज पंचम यांनी क्वीन मेरी बरोबर जाहीर केले की कोलकाता येथून भारताची राजधानी दिल्लीत हलविण्यात येईल. या घोषणेबरोबरच किंग्जवे कॅम्पच्या कोरोनेशन पार्कचे शिलान्यासही करण्यात आले. ते व्हायसरॉय यांचे निवासस्थान होते.
15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने राजधानी म्हणून दुसऱ्या शहराचा विचार केला नाही. कारण, तोपर्यंत नवी दिल्लीचा विस्तार अनेक पटीने झाला होता वेगाने विकास होत होता.स्वातंत्र्यानंतर, दिल्ली नवीन राष्ट्राची राजधानी बनली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आणि दिल्ली आता देशाची राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी बनली आहे.
दिल्ली शहराला एक मोठा राजकीय इतिहास आहे. दिल्लीत सध्या न विसरता येण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. जसे की कुतुब मीनार आणि त्याच्या जवळपासचा परिसर, तुगलगाबाद, हुमायूँ चा मकबरा आणि निज़ाम-उद-दीन औलिया; शेरशाह चा किल्ला, लाल किल्ला आणि जामा मस्जिद. यामध्ये फिरोजशाह कोटला, सफदरजंग मकबरा, हौज-खास आणि लोदी मकबरा यांचा समावेश आहे.