जगभरातील कामगार 1 मे कामगार दिन म्हणून साजरा करतात. 4 मे 1886 रोजी कामगार शिकागो येथे आठ तास काम करण्याची मागणी करत होते. आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी गोळ्या झाडण्यात आल्या. यात अनेक कामगार ठार झाले. यानंतर 1 मे रोजी शिकागोमधील शहीद कामगारांच्या स्मरणार्थ कामगार दिन साजरा करण्यास सुरवात झाली. हिंदुस्थानच्या लेबर किसान पार्टीने 1 मे 1923 रोजी मद्रासमध्ये त्याची सुरुवात केली. त्यानंतर भारतात अनेक कामगार नेते होऊन गेले त्यापैकी दोन झुंझार कामगार नेत्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
दत्ता सामंत–
दत्तात्रय नारायण सामंत म्हणजे डॉक्टर साहेब मुंबईतील गिरणी कामगार त्यांना याच नावाने ओळखत असत. 21 नोव्हेंबर 1931 रोजी जन्मलेल्या दत्ता सामंत यांचा त्यांच्या सुरुवातीच्या जीवनात कामगार चळवळीशी काही संबंध नव्हता. वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी होते आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घाटकोपर येथील पंतनगर येथे डॉक्टर म्हणून काम करू लागले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा दत्ता सामंत यांना मजुरांचे हाल जाणून घेण्याची संधी मिळाली.
हा तो काळ होता जेव्हा मुंबईत काम करणार्या कामगारांमध्ये 10 पैकी 7 कामगार कापड गिरण्यांचे कामगार असायचे. हळूहळू दत्ता सामंत हे या सरंजामी कामगार संघटनेचे सक्रिय नेते म्हणून उदयास आले. जरी ऑटोमोबाईल युनियनमध्ये त्यांची सक्रियता अधिक असली तरी वेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी केलेले त्यांचे अनेक संप यशस्वी झाले.
ग्रेट बॉम्बे टेक्सटाईल स्ट्राइक–
मुंबईच्या कापड उद्योगात अडचण अशी होती की आंतरराष्ट्रीय बाजाराचा या उद्योगावर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. दुसर्या महायुद्धानंतर मुंबईचा कापड उद्योग डबघाईला आला. गेल्या दोन दशकांपासून कामगारांच्या पगारामध्ये विशेष वाढ झालेली नव्हती. दत्ता सामंत यांच्या यशाने प्रभावित होऊन कापड गिरणी कामगारांनी त्यांना त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यास सांगितले. दत्ता यांनी आपल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेच्या विरोधात जाऊन कामगारांना पाठिंबा दर्शविला. ही संघटना कॉंग्रेस कामगार संघटना इंटकशी संबंधित होती. या निर्णयाचे दोन परिणाम झाले. प्रथम त्यांचे कॉंग्रेसशी संबंध गढूळ झाले आणि डाव्या राजकारणाच्या जवळ ते गेले . दुसरा परिणाम म्हणजे आगामी काळात हा संप भारताच्या इतिहासातील प्रदीर्घ कामगार संपांपैकी एक ठरला.
दत्ता सामंत यांनी त्यांची जहाल प्रतिमा आणि हिंसक निदर्शनांमुळे कामगार चळवळीत एक ओळख निर्माण केली होती. परंतु त्या वेळी ऑटोमोबाईल क्षेत्र चांगले पैसे कमवत होते. मालकांसाठी पगार वाढवणे इतके अवघड नव्हते. वस्त्रोद्योगातील परिस्थिती वेगळी होती. आंदोलन सुरू झाले. डॉक्टरांच्या नेतृत्वात तीन लाख गिरणी कामगार घरी बसले. दत्ता सामंत यांची मागणी अशी होती की वेतन वाढीबरोबरच 1947 च्या बॉम्बे इंडस्ट्रियल ऍक्टमध्ये बदल करावा. या कायद्यानुसार नॅशनल मिल मजदूर युनियनशिवाय कोणतीही गिरणी कामगार संघटना असणार नाही.
इंदिरा गांधींना अशा हिंसक प्रवृत्तीच्या कामगार नेत्याला सहन करण्याची इच्छा नव्हती. दत्ता सामंत यांची कोणतीही मागणी पूर्ण होऊ नये, असा त्यांचा निर्धार होता. हा तो काळ होता जेव्हा कॉंग्रेसच्या सांगण्यावरून मुंबईत कट्टर हिंदू प्रवृत्ती असलेले नेते उभे होते. बाळासाहेब बिहारचे राज्यसभेचे खासदार जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म 3 जून 1930 रोजी मंगलोर येथे झाला. त्यांनी फादर व्हावे म्हणून 1946 मध्ये त्यांना बंगळुरू येथे पाठवण्यात आले होते. पण जॉर्जना त्या ठिकाणी करमले नाही आणि ते 1949 ला मुंबईत आले.
येथे रोजगार मिळत नव्हता. सुमारे महिनाभर ते वणवण भटकत होते. तो ते स्वत: म्हणायचे, “बॉम्बेच्या माझ्या सुरुवातीच्या दिवसांत, मी चौपाटीच्या काठावर असलेल्या बाकावर रात्री बसत असे. मध्यरात्री पोलिस येऊन मला पळवून लावत असत. ” सर्वत्र भटकंती केल्यानंतर त्यांना एका ठिकाणी प्रूफ रीडर म्हणून नोकरी मिळाली. आयुष्य परत रुळावर आल. त्यांच्या कामादरम्यान त्यांची ओळख समाजवादी कामगार चळवळीशी झाली.ठाकरे असे त्या नेत्याचे नाव. वर्षभर चाललेल्या या संपात मुंबईमध्ये हिंसक आंदोलने पाहायला मिळाली. बाहेरून मजुर आणून गिरणी चालविण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही.अखेर मध्य मुंबईतील सर्व कापड गिरण्या शहरातून बाहेर पडल्या. येथूनच मुंबईच्या गिरणी कामगार चळवळीचा शेवट सुरू झाला. एक वर्षानंतर, हे आंदोलन कोणत्याही परिणामाविना संपले. लाखो गिरणी कामगार रस्त्यावर आले.
डॉक्टरांचा खून–
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या 1984 च्या निवडणुकीत ते दक्षिण मुंबईत अपक्ष म्हणून निवडून आले होते. यावरून डॉ साहेबांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो.
16 जानेवारी 1997 रोजी दत्ता सामंत सकाळी साडेदहा वाजता आपल्या कार्यालयाकडे जात असताना चार मोटारसायकलस्वारांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यांच्या निधनानंतर मुंबईत तीव्र प्रतिकार झाला. त्यांच्या अंतिम यात्रेत 3 लाख कामगार सहभागी झाले होते. किस्सा असा ही आहे की हजारो कामगार बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी मातोश्रीवर देखील गेले होते. छोटा राजन आणि गुरुदास साटम टोळीवर त्यांच्या हत्येचा आरोप लावण्यात आला. या तिन्ही मारेकऱ्यांना 2005 मध्ये अटक करण्यात आली होती. 2007 मध्ये एका चकमकीत विजय चौधरी ठार झाला.
जॉर्ज फर्नांडिस–
बिहारचे राज्यसभेचे खासदार जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म 3 जून 1930 रोजी मंगलोर येथे झाला. त्यांनी फादर व्हावे म्हणून 1946 मध्ये त्यांना बंगळुरू येथे पाठवण्यात आले होते. पण जॉर्जना त्या ठिकाणी करमले नाही आणि ते 1949 ला मुंबईत आले. येथे रोजगार मिळत नव्हता. सुमारे महिनाभर ते वणवण भटकत होते. तो ते स्वत: म्हणायचे, “बॉम्बेच्या माझ्या सुरुवातीच्या दिवसांत, मी चौपाटीच्या काठावर असलेल्या बाकावर रात्री बसत असे. मध्यरात्री पोलिस येऊन मला पळवून लावत असत. ” सर्वत्र भटकंती केल्यानंतर त्यांना एका ठिकाणी प्रूफ रीडर म्हणून नोकरी मिळाली. आयुष्य परत रुळावर आल. त्यांच्या कामादरम्यान त्यांची ओळख समाजवादी कामगार चळवळीशी झाली.
त्यांच्यावर डॉ लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी कामगार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. या दरम्यान ते 1961 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक झाले. पण त्यांच्या कारकिर्दीला खरे राजकिय वळण मिळाले ते 1967 मध्ये . जॉर्ज यांना जायंट किलर असे नवे नाव मिळाले. लोकसभा निवडणुक होणार होती. त्यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून कॉंग्रेसचे लोकप्रिय नेते सदाशिव कानोजी पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले. येथे त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराने निवडून येण्याची कोणतीही आशा नव्हती. परिणाम अपेक्षेच्या अगदी उलट झाला. निकालानंतर जॉर्जने 48.5 टक्के मते घेत ऐतिहासिक विजय मिळविला. यानंतरची त्यांची राजकीय रणनीती इतिहासाच्या पानांमध्ये सहज सापडते.
1974चा रेल्वे संप
स्वातंत्र्यानंतर तीन वेतन आयोग आले होते, परंतु रेल्वे कर्मचार्यांच्या पगारामध्ये कोणतीही उल्लेखनीय वाढ झाली नाही. जॉर्ज त्यावेळी ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष होते. पगारामध्ये वाढ करावी या मागणीसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी राष्ट्रीय समन्वय समिती गठीत करण्यात आली. 8 मे 1994 ला मुंबईत संप सुरू झाला. नंतर टॅक्सी चालक, विद्युत संघटना आणि परिवहन संघटना देखील यात सामील झाल्या. संपाच्या समर्थनार्थ मद्रास कोच फॅक्टरीचे दहा हजार कामगारही रस्त्यावर उतरले. रेल्वेतील कर्मचार्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह गया मधील रुळांवर कब्जा केला. काही वेळासाठी संपूर्ण देश थांबला.
संपाबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली. एमनेस्टी इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार 30 हजाराहून अधिक कामगार नेत्यांना संप मोडीत काढण्यासाठी तुरूंगात टाकले गेले होते. 27 मे रोजी समन्वय समितीने कोणतेही कारण न सांगता संप मागे घेण्याची घोषणा केली. अशा प्रकारे देशातील सर्वात यशस्वी रेल्वे संप संपला. नंतरच्या काळात असे म्हटले जात होते की संपामध्ये सामील झालेल्या लोकांनी वेगवेगळी मते मांडायला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत आंदोलन पुढे नेणे कठीण झाले. या संपामुळे सरकारच्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षितत भावनेमुळे पुढे आणीबाणी लागू झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.