बाईक बंद केल्यावर टिक टिक आवाज का येतो?

बाईक बंद केल्यावर टिक टिक आवाज का येतो..? जर तुम्ही बाईक वापरली असेल तर तुम्हाला हा  अनुभव नक्कीच आला असेल. थोडावेळ बाईक चालवल्यानंतर आपण ती स्टँडवर ठेवता तेव्हादेखील तिच्या इंजिनमधून टिक टिक आवाज येत राहतो. तर  आवाज  नक्की का येतो?  हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? चावी काढून टाकल्यानंतरही इंजिन चालू राहते काय? किंवा इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे. तर हा आवाज का येतो याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत…

डॉ एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट झालेल्या एका इंजिनियरने दिलेल्या माहितीनुसार, वाहनातून निघणार्‍या धूरात अनेक प्रकारचे हानिकारक कण असतात. त्यापैकी एक कार्बन मोनोऑक्साइड आहे जो एक अत्यंत विषारी वायू आहे. या व्यतिरिक्त असुरक्षित हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड देखील असतात. जे अम्लीय वर्षा आणि स्मॉगमुळे तयार होतात. 

यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना  सामोरे जाण्यासाठी वाहनांच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये अनुप्रेरक कन्व्हर्टर बसवले जाते. ज्याला सायलेन्सर म्हटले जाते. जे या वायूंवर प्रक्रिया करते आणि कार्बन मोनोऑक्साइडला कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यात रूपांतरित करते. नायट्रोजन ऑक्साईड्सला नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये रूपांतरित करते.

Tik Tik sound

मोटारसायकलच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये कॅलॅटिक कन्व्हर्टर देखील बसवले गेले आहे आणि जेव्हा आपण बाईक काही काळ चालवितो तेव्हा एक्झॉस्ट त्याच्याबरोबर गरम होतो आणि त्याचबरोबर कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील पाईपही गरम होते.

म्हणून बाईक बंद केल्यावर टिक टिक आवाज येतो..

त्यामुळे इंजिन बंद केल्यानंतर या प्रक्रियेमध्ये आपल्या टिक टिक रूपात ऐकू येणारा क्लिकिंग आवाज येतो. या ध्वनीचा अर्थ आपली बाइक बरोबर आहे. इंजिन चांगले काम करत आहे असा होतो.