कधी विचार केलाय का रेल्वे रुळांना गंज का नाही लागत?

आपल्या घरात असलेल्या काही लोखंडी किंवा इतर धातुंपासून तयार केलेल्या वस्तू काही दिवस उघड्यावर राहिल्या किंवा त्यांचा पाण्याशी संपर्क आला तर काही काळात त्यांना गंज लागतो. मात्र, देशभरात अनेक ठिकाणी पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्यात उघड्यावर असलेल्या रेल्वे रुळांना का बरं लागत नाही गंज आणि लागलाच तर त्याचे पुढे काय होते.. असा विचार तुम्ही कधी केला आहे का? थोडी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे..

तर मित्र-मैत्रींनींनो उघड्यावर उन्हात आणि पावसात असणाऱ्या या रेल्वे रुळांना गंज लागतो बरे. परंतु, इतर वस्तुंपेक्षा रेल्वे रुळांना गंज उशीरा लागतो. रेल्वे रुळ बनविण्यासाठी वापरले जाणारे स्टील इतर स्टीलपेक्षा वेगळे असते. रेल्वे रुळांमध्ये वापरले जाणारे स्टील उत्तम दर्जाचे मिश्रण असलेले स्टील असते.या स्टीलमध्ये मँगलोई मिसळून रेल्वे रुळ तयार केले जातात. स्टील आणि मॅंगलोईच्या मिश्रणाला मॅंगनीज स्टील म्हणतात. यामध्ये १२% Manganese आणि १% Carbon मिसळले असते. ज्यामध्ये गंज लागण्यापासून रक्षण करण्याची क्षमता असते. भारतीय रेल्वेसाठी वापरले जाणारे रेल्वे रुळ हे भिलाई स्टील प्लांट आणि जिंदाल स्टील प्लांटमधून तयार होतात. 

ज्यामध्ये गंज प्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी आणि रेल्वेचा भार पेलविण्यासाठी यामध्ये कार्बन आणि मॅगनीज एकत्रित करुन वापरले जाते. असा विश्वास आहे की स्टीलमध्ये असलेल्या मिश्रणामुळे रेल्वे रुळांचे ऑक्सिकरण प्रमाण खूपच कमी असते. यामुळे वर्षानुवर्षे रुळ गंजत नाहीत. जर रेल्वे रुळ साधारण लोखंडापासून बनले तर हवेच्या आर्द्रतेमुळे ते गंजतील. यामुळे रुळ वारंवार बदलावे लागतील आणि त्यामुळे खर्च वाढेल. म्हणून हवा आणि उघड्यावर असूनही 20 वर्षांपर्यंत या रुळांना कोणत्याही प्रचारचा गंज लागत नाही.

रेल्वे रुळांमध्ये मॅगनीजचे मुख्य कार्य रेल्वे रुळांना मेंटेन ठेवणे असते. तसेच रेल्वे रुळावरुन वारंवार गाड्यांची ये-जा सुरु राहिल्यामुळे हे रुळ नेहमी चकचकीत राहतात. तसेच रेल्वे रुळांना गंज न लागण्याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे. स्टील आणि मँगलोई यांचे मिश्रण,जे रेल्वेच्या रुळांना गंजण्यापासून वाचवते. सुरुवातीपासूनच अँटी-गंज धातूंचा वापर रेल्वेमध्ये केला जातो. ब्रिटीशांनी भारतात रेल्वे सुरू केली. त्यांनीही रेल्वे ट्रॅक मजबूत करण्यासाठी अँटी-गंज धातूचा वापर केला होता.