हिटलर हे पात्र असं आहे जे मृत्यूनंतरही अनेकांच्या स्मरणात आहे. एखादा व्यक्ती आपल्या मर्जीप्रमाणे इतरांना वागवत असेल तर अनेकदा ‘तु हिटलर आहेस का’? असे सहज म्हटले जाते. जगभरात ज्याच्या हुकूमशाहीची चर्चा होती त्या हिटरबद्दल अनेक रोचक गोष्टी वाचायला ऐकायला मिळतात. पण या हुकुमशहाचा अंत मात्र प्रचंड विदारक पद्धतीने झाला. एडॉल्फ हिटलरने आत्महत्या करुन आपला जीवन प्रवास संपवला. तर आपण जाणून घेणार आहोत का केली हिटलर ने आत्महत्या.
ऑस्ट्रेलियामधील एका शहरात 20 एप्रिल 1889 रोजी जन्मलेल्या हिटलरने दहशतीचे अनेक नवे अध्याय लिहिले. हिटलरचे वयाच्या 56 व्या वर्षी निधन झाले. त्यावेळी तो हवाई हल्ल्यापासून बचावासाठी बर्लिनमध्ये तयार केलेल्या भुयार मध्ये लपला होता. 10 दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवशी, हिटलर शेवटच्या वेळी भुयारामधून बाहेर आला आणि सोव्हिएत युनियनच्या रेड आर्मीतून लढणार्या सैनिकांना लोखंडी क्रॉस भेट दिले. संध्याकाळी हिटलरची जोडीदार ईवा ब्राऊन ने एक छोटी पार्टी ठेवली होती. पण या पार्टीमध्ये कोणतेही महत्वाचे नेते सहभागी झाले नव्हते. मृत्यूच्या आधी हिटलरला एक गोष्ट चांगलीच ठाऊक होती की जर्मनीचा पराभव निश्चित आहे.
आत्महत्येबाबत मागितला होता डॉक्टरांना सल्ला-
बर्लिनची लढाई 16 एप्रिलपासून सुरू झाली. त्यानंतर विरोधी देशाती सैन्याने हळू हळू बर्लिनच्या दिशेने सरसावत होते. प्रत्युत्तर देण्यासाठी हिटलरकडे पुरेसे सैन्य नव्हते. त्या परिस्थितीत हिटलरने आपल्या सेनापतींवर शाब्दिक हल्ला चढविला. मग त्याने जाहीर केले की आपण युद्ध हारलो आहोत. त्यानंतर त्यांने आत्महत्या कशी करावी याबद्दल डॉक्टरांकडून सल्लाही मागितला होता. डॉक्टरांनी त्याला सायनाइडची गोळी घ्यावी किंवा डोक्यात गोळी घालून आत्महत्या करता येईल असेही सांगितले होते.
… आणि जेव्हा हिटलर हतबल झाला
हिटलर आत्महत्येची योजना आखत आहे हे नाझी पक्षाच्या इतर नेत्यांना कळले होते. त्यांनी पक्ष आल्या ताब्यात घेण्याची योजना आखली. त्या नेत्यांपैकी एक होता हरमन गोरिंग. हिटलरने गेरिंग यांना राजीनामा द्यावा किंवा शिक्षा भोगण्यास तयार राहायला सांगितले. दरम्यान, नाझी पक्षाचे सामर्थ्यवान नेते हेनरिक हिमलर यांनी मित्र राष्ट्रांना शरण जाण्याची ऑफर दिली, जी मित्रपक्षांनी धुडकावून लावली. त्यानंतर हिटलरने हिमलरला अटक करण्याचे आदेश दिले. पण हिटलरच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. हिटलरच्या आयुष्यातली ही पहिलीच वेळ होती की तो हतबल झाला होता. कोणीही त्यांचे आदेश ऐकत नव्हते.
मध्यरात्री भुयारामध्ये केले लग्न-
दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही हे हिटलरच्या लक्षात आले. 29 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर त्याने भुयारामध्ये एक छोटासा सोहळा आयोजित करुन त्यामध्ये ईवा ब्राऊनशी लग्न केले. त्यानंतर त्याने आपले मृत्यूपत्र तयार केले आणि आपल्या वैयक्तिक सचिवांकडे दिले आणि झोपायला गेला.
…आणि अशा प्रकारे झाला हिटलरचा अंत-
आंदोलकांनी बेनिटो मुसोलिनीला गोळ्या घातल्याची बातमी हिटलरपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मग त्याने आपल्या कुत्र्यावर सायनाइड गोळ्यांचा प्रयोग केला. 30 एप्रिल 1945 रोजी दुपारच्या जेवणानंतर, हिटलर आणि ब्राऊनने भुयारातील उर्वरित सैनिकांना निरोप दिला. मग तो त्याच्या अभ्यासाच्या खोलीत आला. दोघांनी आत्महत्या केली तेव्हा खोलीत दुसरे कोणीच नव्हते. बंकरमध्ये हजर असलेल्या इतर सैनिकांनी सांगितले की दुपारी 3.30 च्या सुमारास त्यांना जोरदार बंदुकीची गोळी चालल्याचा आवाज आला. थोड्या वेळाने बदाम जळल्याचा वास खोलीबाहेर पसरला जो सायनाइडचा वास होता. नंतर उघडकीस आले की हिटलरने स्वतःला गोळ्या मारुन घेतल्या होत्या तर ब्राऊनने सायनाइड खाऊन आत्महत्या केली होती.
…या गोष्टींना घाबरत असे हिटलर-
हिटलरच्या दहशतीला सर्वजण घाबरत असले तरीही तो स्वतःही प्रचंड भित्रा होता. त्याला किरकोळ गोष्टींची भीती वाटे. जसे, अलेक्झांडर, नेपोलियन, मुसोलिनी आणि हिटलर या सर्वांना मांजरांची प्रचंड भीती वाटत असे. दुसर्याच्या हातात ब्लेड पाहूनही त्याला भीती वाटत असे. तो दाढी आणि केस कापायला देखील घाबरत असे. त्याला असे वाटे की लोक त्याला जीवे मारणार आहेत. या भीतीमुळे तो स्वत: ची दाढी स्वतः करत असे. दुसऱ्यांच्या हातून मरणे हिटलरला कधीही मान्य नव्हते.