काय आहे सियाचीन ग्लेशियर वाद? जाणून घ्या..

जगातली सर्वात उंच युद्धभूमी

सियाचीन ग्लेशियरला संपूर्ण जगात सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखले जाते. सियाचीन ग्लेशियर हे स्थान पूर्व कारकोराम / हिमालय, येथे आहे . हे स्थान भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ जवळजवळ रेखांश: 76.9° पूर्व, अक्षांश: 35.5° उत्तर येथे आहे . तसेच ते समुद्रसपाटीपासून 17770 फूट उंचीवर आहे.  सियाचीन ग्लेशियरचे क्षेत्रफळ सुमारे 78 किमी आहे. सियाचीन काराकोरमच्या पाच मोठ्या हिमनद्यांपैकी सर्वात मोठी आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी हिमनदी आहे.

नक्की काय आहे सियाचीन ग्लेशियर वाद- 

समुद्रसपाटीपासून 17770 फूट उंचीवर असलेल्या सियाचीन ग्लेशियरच्या एका बाजुला पाकिस्तानची सीमा असून दुसऱ्या बाजूला चिनी सीमा “अक्साई चिन” हे क्षेत्र आहे. सध्या या दोन देशांवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने या भागात सैन्य तैनात केले आहे. 1984 पर्यंत या ठिकाणी भारत किंवा पाकिस्तान या दोन्ही देशांचे सैनिक या ठिकाणी तैनात नव्हते. 

वादाचे मुख्य कारण-

1972 च्या शिमला करारामध्ये सियाचीनला पडीक आणि नापीक जमीन असे घोषित केले होते. परंतु या करारामध्ये दोन्ही देशांमधील सीमा निश्चित झालेली नव्हती. सन 1984 च्या सुमारास भारताला अशी माहिती मिळाली की, पाकिस्तान सियाचीन ग्लेशियरवर हक्क प्रस्थापीत करण्यासाठी युरोपच्या कोणत्यातरी कंपनीकडून विषेश प्रकारचे गरम कपडे शिवून घेत आहे. त्यानंतर तात्काळ भारताने पाकिस्तानच्या आधी गरम वस्त्रे तयार करुन घेतली. या वस्त्रांचे वाटप भारतीय सैन्याच्या तुकड्यांमध्ये करण्यात आले आणि 13 एप्रिल 1984 ला भारतीय सैन्य सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात करण्यात आले. भारतीय सैन्याने या ठिकाणी आपले स्थान घेतल्यानंतर भारतीय सैन्याकडून “ऑपरेशन मेघदूत” चालविण्यात आले. खरे पाहता हे सूट पाकिस्तानी लष्कराला प्रथम मिळाले असते तर पाकिस्तानी सैन्य या ठिकाणी प्रथम पोचले असते.

पाकिस्तान लष्कराचा पहिला प्रयत्न ठरला असफल-

पाकिस्तानी लष्करानेही 25 एप्रिल 1984 रोजी या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु खराब हवामान आणि तयारी नसल्यामुळे त्यांना अर्ध्यातून परतावे लागले. अखेर 25 जून 1987 रोजी पाकिस्तानने 21 हजार फूट उंचीवर Quid post तयार करण्यात यश मिळविले. कारण, भारतीय सैन्याजवळ असलेला दारुगोळा संपला होता. परंतु, भारतीय सैन्याने यापूर्वीच या ठिकाणी ताबा मिळविला असल्याने या हिमनदीचा वरचा भाग सध्या भारताच्या आणि खालचा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. 2003 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम करारावर स्वाक्षरी झाली. तेव्हापासून या भागात गोळीबार आणि सैन्यात होणाऱ्या चकमकी थांबल्या आहेत. परंतु दोन्ही बाजूचे सैन्य या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. भारताचे 10 हजार सैनिक सियाचीन मध्ये तैनात आहेत  आणि त्यांच्या देखरेखीवर दिवसाला 5 कोटी रुपये खर्च केले जातात.

सैनिकांना आलेल्या घामाचाही होतो बर्फ-

सियाचीनमध्ये सैनिकांची नियुक्ती 18000 ते 23000 फूट उंचीवर केली जाते. ज्या ठिकाणी तापमान उणे 55 अंश डिग्री सेल्सियस पर्यंत उतरते कारण या क्षेत्रात 22 हिमनद्या आहेत. सियाचीन ग्लेशियरची परिस्थिती इतकी भयानक आहे की आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी ऑक्सिजन लेव्हल केवळ 30% या ठिकाणी उपलब्ध आहे. येथे सैनिकांना गुडघ्यापर्यंत बर्फात चालावे लागते. अगदी निरोगी सैनिकदेखील काही अंतर चालत जाऊ शकतो. जर एखाद्या सैनिकाच्या हातमोजे, शूजमध्ये घाम आला तर काही सेकंदात त्याचे बर्फात रुपांतर होते. त्यामुळे या सैनिकांची शारिरीक स्थिती बिघडत जाते. 

सियाचीन मधल्या सैनिकांविषयी काही महत्वाचे मुद्दे- 

  • सियाचीन ग्लेशियरमधील सैनिकांनी हात मोज्यांमधून बोटे बाहेर काढली तर ती काही वेळात थंडीने सडल्यारखी होतात. 
  • तापमान उणे असल्यामुळे रायफलदेखील गोठते. 
  • मशीन गनला गोळीबार करण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ घातली जाते. 
  • सैनिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार अन्न मिळणे शक्य होत नाही. 
  • जवानांचे वजन 3 ते 4 महिन्यांत 5 ते 10 किलो कमी होते.
  • संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेद्वारे खास तयार केलेले खाद्य पाठविले जाते.
  • सैनिकांना नेहमीच स्टोव्ह जाळायचा असतो आणि बर्फापासून पाणी बनवावे लागते.
  • आग / इंधनाची योग्य व्यवस्था नसल्यामुळे हे काम खूप अवघड आहे. 
  • सियाचीन परीसरात सैनिकांच्या मृत्यूचे मुख्य कारण प्रतिकूल हवामान आहे. 
  • भारत पाक युद्धा शिवाय हवामानामुळे येथील सैनिकांचा झाला आहे मृत्यू. 
  • प्राप्त माहितीनुसार दोन्ही देशांच्या 2500 सैनिकांनी आतापर्यंत येथे जीव गमावला आहे.