मराठ्यांचे उंबरखिंडीतील गनिमी युद्ध ! जय शिवराय.

रयतेचे राजे हिंदवी स्वराज संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भाग असेलेला कोकण पट्टा काबीज करण्यासाठी, बेरकी नजर असलेल्या शाईस्तेखानाने त्याच्या सैनापती कर्तालाब खानास मराठा सैन्यास चिरडण्यासाठी  पाठवले.

कर्तालाब खानाने सन १६६० जून च्या दरम्यान पुणे येथे तळ ठोकून चाकण किल्ला ताब्यात घेतला होता, व फेब्रुवारी १६६१ रोजी कोकण पट्टा हस्तगत करण्यासाठी, कर्तालाब खान २०००० सैन्याचा ताफा, तोफखाना आणि शस्त्रा सहित पुण्याहून रवाना झाला. या मोहिमेत उत्तरेकडील किल्ले ताब्यात घेण्यासाठी त्याच्या सोबत प्रसिद्ध राय बागान देखील होती.

मजल-दर-मजल करीत २ फेब्रुवारी १६६१ ला तो २०००० सैन्यासह पुढे निघाला, मराठा सैन्या सारखा गनिमी युद्धाचा त्याला अनुभव नव्हता, परंतु खुले मैदानी युद्धात तो तरबेज व पारंगत होता, उत्तर भारतातील मोकळ्या मैदानाचा अनुभव हि मोठी जमेची बाजू त्याच्याकडे होती. शिवाजी महाराजांचे तूट पूंजे सैन्य, परंतु डोंगराळ प्रदेशातील गनिमी युद्धाचा असलेला अनुभव व हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांनी प्रेरित मावळ्यांशी झुंज देणे हे कर्तालाब खानाच्या सैन्यास वैचारिक दृष्ट्या अनुकूल नव्हते.

कर्तालाब कोकणाकडे निघाला..

चिंचवड, तळेगाव, वडगाव या मार्गाने लोहगड किल्ल्या कडे वळून पुढे मार्गस्त होण्या ऐवजी सोप्पा मार्ग बदलून त्या ऐवजी सैयाद्रीचा घाट माथा उंबरखिंड कडे जाणारा अरुंद मार्ग त्याने निवडला, त्याची मूळ योजना बोर घाट मार्गे जाण्याची होती, तसे पाहिलेतर तो मोकळा मार्गा होता, खरंतर जर कर्तालाब खानाने बोरघाट मार्ग निवडला असता तर महाराजांसाठी हे युद्ध खूप कठीण झाले असते, कारण हा मार्ग खूपच विस्तृत आणि मोकळा होता.

शिवाजी महाराजांचा एक पैलू खूप जणांना माहित नाही, तो म्हणजे त्याच्याकडे एक अद्भुत बुद्धिमत्ता व हेरगिरी चे जाळे होते , त्यामुळे त्यांनी खूप लढाया जिंकल्या व त्यांच्याकडे असे हेर होते, जे शत्रूच्या प्रत्येक क्षणाचा मागोवा ठेवत असत आणि त्यांना नेहमी एक पाऊल पुढे ठेवत असत.

महाराज फक्त बुद्धिमत्ता गोळा करत नव्हते, तर शत्रूंना फसवण्यासाठी खोटी माहिती देखील शत्रूपर्यंत पोहचवत. रायगड जिल्ह्यातील पेन येथे महाराज आहेत अशी खोटी माहिती हेराद्वारे कर्तलाब खाना पर्यंत पोहचवली. ह्या खोट्या माहितीमुळे, कर्तालाब खानाने बोर घाट मार्गा ऐवजी  उंबरखिंडीतून जाण्याचे ठरवले, पण हा एक सापळा होता ज्यात कर्तालाब खान फसला.

सापळा हा उंबरखिंडचा रस्ता होता जिथे महाराज आणि त्यांचे १००० बलवान सैनिक बाण, दगड, रायफलसह सज्ज होते. घनदाट जंगला मुळे मराठ्यांना लपणे सोप्पे झाले.

मुघल सेना जशी जवळ आली , मराठ्यांनी बेमुदत मुघुल सैन्यावर दगडफेक करून हल्ला सुरू केला आणि चारही बाजूंनी त्यांना वेढले, दाट जंगलामुळे मुघल सैनिक मराठा सैन्यांना पाहू शकले नाहीत. मराठ्यांनी त्यांच्यावर झेप घेतल्यामुळे मुघल सैन्यासाठी एक हि मार्ग मोकळा नव्हता आणि २-३ तासातच लढाई संपली.

कर्तालाब खानास शिवाजी महाराजांना निरोप पाठवावा लागला, की ते शरण येण्यास तयार आहेत, महाराजांनी तो प्रस्ताव मान्य केला व कर्तालाब खानने महाराजांसमोर हत्यारे टेकवली.

पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या सोबत असलेल्या १००० बळकट मराठा सैन्याने हुशार रणनीती आणि डावपेचांचा वापर करून सुमारे २०,००० च्या मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. उंबरखिंड येथील विजय हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील एक मोठा विजय मानला जातो आणि म्हणूनच कालांतराने त्या ठिकाणी हा विजयउत्सव साजरा केला जात आहे.